Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कर्जतमध्ये आगमनाची जय्यत तयारी !

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कर्जतमध्ये आगमनाची जय्यत तयारी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, राज्याचे उपमुख्यमंत्री नाम. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व अनेक मंत्री गण त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे धुरंधर नेतृत्व खासदार सुनील तटकरे , मंत्री आदिती ताई तटकरे , आमदार अनिकेत दादा तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत – खालापूर मतदार संघाचे तरुण तडफदार व सक्षम नेतृत्व म्हणून उदयास आलेले राजिपचे मा. उपाध्यक्ष तथा शिक्षण – क्रीडा – आरोग्य सभापती सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका जनसंपर्क कार्यालय ” लोकार्पण सोहळा ” व ” मंथन सभा ” बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पोलीस मैदान कर्जत येथे ठीक ४ – ०० वाजता होणार आहे . हि सभा ” न भूतो – न भविष्यती ” अशी होण्यासाठी विधानसभेचे पक्ष नेतृत्व सुधाकर शेठ घारे व संपूर्ण कर्जत तालुका पदाधिकारी जय्यत तयारीला लागले असून , या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

प्रथमच कर्जतमध्ये येणारे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आगमनानिमित्त होणाऱ्या सभेला कसे नियोजन असावे , याकरिता दि. २२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्रभागाचे , पंचायत समिती प्रभाग व कर्जत तालुका, कर्जत शहर कमिटी , महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी या सर्व विभागवार पदाधिकारी वर्गाला पक्ष नेतृत्व सुधाकर शेठ घारे यांनी २९ तारखेच्या सभेचे नियोजना संबंधी मार्गदर्शन केले.

कर्जत खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे उमेदवार व ” भावी आमदार ” म्हणून नेतृत्व करू पहाणारे मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांचे यापूर्वीचे प्रत्येक कार्यक्रम नियोजनपूर्ण झाले असून गर्दीचा उच्चांक गाठणारे होते . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यावर प्रथमच अजित दादा पवार हे कर्जत येथे येत असल्याने या सभेला देखील ” न भूतो न भविष्यती ” अशी गर्दी होणार आणि कर्जतकर म्हणणार ” सुधाकर भाऊ , नाद नाही तुमचा ” , म्हणूनच या सभेकडे विरोधक देखील लक्ष ठेवून आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page