Tuesday, October 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" उपोषणकर्ते रमेश दादा कदम यांच्या समोर अखेर प्रशासन नमले "

” उपोषणकर्ते रमेश दादा कदम यांच्या समोर अखेर प्रशासन नमले “

पेण अर्बन बँक प्रकरणी ठिय्या आंदोलन – साखळी उपोषण – विष प्राशन आंदोलन यशस्वी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली १४ वर्षे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना वेगवेगळ्या पद्धतीने कायद्याच्या काचोटित अडकवून बुडालेले पैसे परत न देण्याची भूमिका असलेल्या प्रशासनाला गेली १० दिवस ठिय्या आंदोलन – साखळी उपोषण – आमरण उपोषण व शेवटी विष प्राशन करून आत्मदहन करण्याच्या भूमिकेमुळे अखेर ” आमरण उपोषणाचा बादशाह ” पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी नमवले असून रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे हे देखील ” मा. कोर्टाचा अवमान ” करत मासिक बैठका घेत नसल्याने ” पळकाढू ” धोरण पुढे करत असल्याने ते देखील या आंदोलनामुळे चांगलेच ” सुतासारखे सरळ ” झाले आहेत . पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांचे हे आंदोलन त्यामुळे नक्कीच ” यशस्वी ” झाल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे.

कर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम व पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने हे जन आंदोलन ठेवीदार व खातेदार यांना त्यांचे ठेवीची रक्कम परत मिळाली म्हणून दि.३० सप्टेंबर २०२४ पासून लोकमान्य टिळक चौक , कर्जत येथे प्राणांतिक आमरण उपोषणाला बसले होते . अखेर १० व्या दिवशी ” मुजोर प्रशासन ” नमले असून उपोषणकर्ते व कर्जत तहसीलदार धनंजय जाधव , उप विभागीय अधिकारी ( प्रांत ) प्रकाश संकपाळ , कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या झालेल्या बैठकीत बँकेचे प्रशासक मंडळाकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मा.उप संचालक, डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट, डिपॉझिट इंन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन यांना आपले मागण्यांबाबत पत्र व्यवहार करण्यात आलेला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आलेली आहे. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य. पुणे यांनाही त्यांचे स्तरावरुन संबधित विभागांना कळवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे , व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दि.१७/१०/२०१५ रोजीचे आदेशानुसार मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचे अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कृती समितीची सभा दि.१६ ऑक्टोंबर २०२४ रोजी घेण्यात येणार असून आपले मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येईल , असे लेखी आश्वासन प्रशासक यांनी दिल्याने , हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.

रायगड जिल्हाधिकारी यांना मासिक सभा घेण्याचे मा. हायकोर्टाचे आदेश असताना त्यांनी ” कर्तव्यात कसूर ” केल्याची आठवण पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी करून त्यांच्यावरच ” कारवाई ” करण्याची मागणी केली असल्याने हा फरक झाला असून दिलेल्या आश्वासनात पुन्हा चाल ढकल केल्यास हे जन आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा , प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी उपोषण स्थगित करताना ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी प्रशासनाला दिला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page