Friday, March 14, 2025
Homeपुणेलोणावळाउर्दू माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ..

उर्दू माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ..

लोणावळा : उर्दू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी विद्यालयाच्या आवारात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवदुर्ग मित्र संघटनेचे अध्यक्ष सुनील गायकवाड होते. तसेच योगेश उंबरे, नासिर शेख, अन्वर निंबरगी, आनंद गावडे, रोहित वर्तक, ओमकार पडवळ, बलकवडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नासिर शेख यांच्या हस्ते सुनील गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक सईद सर यांनी आभार प्रदर्शन केले. खेळीमेळीच्या वातावरणात हा निरोप समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.
- Advertisment -

You cannot copy content of this page