Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडउल्हास नदीवरील " कैची घाट व उद्यान लोकार्पण सोहळा व नामकरण "नगराध्यक्षा...

उल्हास नदीवरील ” कैची घाट व उद्यान लोकार्पण सोहळा व नामकरण “नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील उल्हास नदीच्या तीरावर असलेला कैची घाट तयार करून त्यांचे लोकार्पण व नामकरण ” श्री राधाकृष्ण घाट ” करणे व शनी मंदिराच्या बाजूला उद्यान तयार करणे या कामांचे लोकार्पण आज कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल.

रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्जत नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उल्हासनदीवर कैची घाट तयार करणे व शनिमंदिराच्या बाजूला उदयान सुशोभीकरण करणे व या जुन्या कैची घाटाचे त्या शेजारीच असणाऱ्या श्री राधाकृष्ण मंदिरामुळे ” श्री राधाकृष्ण घाट – कर्जत ” असे नामकरण करणे , या कामांचे लोकार्पण सोहळा आयोजित केला होता . सदरच्या कामांचे लोकार्पण नगराध्यक्षा सौ . सुवर्णा जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

श्री राधाकृष्ण मंदिराच्या मागणीवरून कैची घाटचे नाव बदलून ” श्री राधाकृष्ण घाट ” व उद्यान सुशोभीकरण केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांना श्री राधाकृष्ण मंदिर व मारुती सेवा संस्थान कर्जत यांच्या वतीने सन्मानित करून तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्षा तथा शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ. सुवर्णा जोशी यांच्या समवेत उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगरसेवक राहुल डाळींबकर , पाणी पुरवठा सभापती सौ. वैशाली मोरे , नगरसेवक दांडेकर , श्री राधा कृष्ण मंदिर अध्यक्ष – अमित गुप्ता , उपाध्यक्ष – स्वप्नील गुप्ता , उपाध्यक्ष – नितीन गुप्ता , सचिन गुप्ता , सूर्यकांत गुप्ता , शिवलाल गुप्ता , शिवकिशोर गुप्ता , उमाशंकर गुप्ता , पंछी गुप्ता , गौरव भानुसगरे , गणेश शिंदे , भाऊ दिवेकर , शिवसेवक गुप्ता ,
निलेश गायकवाड , श्री ज्ञानेश्वरी पारायण चे सर्व सदस्य , परिसरातील नागरिक , महिला वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page