Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" ऍड. मनोज क्षीरसागर कर्जत बार असोसिएशनचे नवे अध्यक्ष "

” ऍड. मनोज क्षीरसागर कर्जत बार असोसिएशनचे नवे अध्यक्ष “

बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर ” अभिनंदनाचा ” वर्षाव !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सन २०२५ – २६ या वर्षासाठी ” ऍड. मनोज किसन क्षीरसागर ” यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे . कर्जत बार असोसिएशनने या वर्षात अध्यक्ष पदासाठी निवडणूक मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती . सदरील निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी ऍड. अजय मेढी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.


या निवडणुकीमध्ये कर्जत बार असोसिएशनचे मेंबर ऍड. किशोर देशमुख , ऍड. संदीप बागडे व ऍड. मनोज क्षीरसागर या निवडणुकीमध्ये उभे होते . दरवर्षी कर्जत बार असोसिएशनची परंपरा आहे की , ” इलेक्शन ” न घेता सर्वानुमते ” सिलेक्शन ” करण्यात येते , त्याप्रमाणे दोन्ही मेंबर्सनी म्हणजेच ऍड. संदीप बागडे व किशोर देशमुख यांनी माघार घेतल्याने ऍड. मनोज किसन क्षीरसागर यांस ” कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.


ऍड. मनोज किसन क्षीरसागर हे नेरल सम्राट नगर येथे रहात असून सन २००६ साली त्यांनी वकिली परिक्षेत उत्तीर्ण होऊन ” सनद ” प्राप्त केली आहे .अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले . त्यांचे बाबा किसन धाऊ क्षिरसागर एक सुतार होते , त्यांना सुतार कामात मदत करत ऍड. मनोज क्षीरसागर यांनी शिक्षण घेतले . फार गरिबीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत एल.एल.बी. ही शिक्षण ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ ” वडाळा येथून सनद घेतली . कर्जत न्यायालयात २००७ – २००८ पासून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली . त्यांनी आज पर्यंत कर्जत न्यायालयात अनेकांना आपल्या ” बुद्धी चातुर्याने ” विजयी होत ” न्याय ” मिळवून दिला आहे.


सदरील निवडणुकीमध्ये कर्जत बार असोसिएशनचे वरिष्ठ विधीज्ञ राजेंद्र निगुडकर साहेब , ऍड. डिमेलो साहेब , ऍड. पाटील , अरुण नायक , मेढी , पादिर , नरेश आहीर , रविकर गायकवाड , एम जे ओसवाल , तसेच इतर सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले . माझ्या अगोदर इतर अनेक ज्येष्ठ वकील अध्यक्ष झालेले असून , अनेक वर्ष प्रतीक्षा करून या अध्यक्ष पदाचा मान मला मिळालेला आहे . मी सर्वांच्या सहकार्यातून ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याच्या व सर्वांना अधिकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन , असे मत नवनिर्वाचित कर्जत तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मनोज किसन क्षीरसागर यांनी व्यक्त केले . यावेळी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page