२४ तासांत खोपोली आरोपींनच्या मुसक्या आवळल्या..
रात्रीच्या वेळी मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बंदुकीचा धाक वाहनचालकांना दाखवून वाहन ओव्हरटेक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती ,याची दखल खोपोली पोलिसांनी घेतली असून कारसह ४ जणांना अटक केली आहे, मात्र आरोपींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
रात्रीच्या वेळी मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून महिंद्रा मराजो या गाडीतून प्रवास करीत असताना एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याने त्यातील दोन तरुणांनी बंदुकीचा धाक वाहन चालकांना दाखवीत कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याचा व्हिडिओ खासदार इम्तियाय जलील यांनी ट्विटर वर पोस्ट केला होता.
याबाबत खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याचे आदेश गृहमंत्री यांनी दिल्याने खोपोली पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत कार सह चार आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.