Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडएक तारीख - एक तास - एक साथ , " कचरा मुक्त...

एक तारीख – एक तास – एक साथ , ” कचरा मुक्त भारत अभियान ” हालीवली ग्रामपंचायत हद्दीत संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून रविवार दिनांक १ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १० ते ११ या वेळेत आपल्या हालीवली ग्रामपंचायत हद्दीत ” स्वच्छता ही सेवा ” कचरा मुक्त भारत अभियान हा भारत सरकारचा उपक्रम राबविण्यात आला . या अभियानात अनेक नागरिकांनी भाग घेऊन आपला अमूल्य वेळ ग्रामपंचायतीला देऊन , आपले गाव हे स्वच्छ करावयाचे आहे , या उद्देशाने सहभाग घेतला.

एक तारीख – एक तास – एक साथ हा ” स्वच्छतेसाठी श्रमदान ” या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्हा, परिषद स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) नुसार ” स्वच्छता ही सेवा ” १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर २०२३ ” अभियान नुसार , असे भारत सरकारचे आदेश आल्याने ते कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचातीतर्फे सर्व ग्रामस्थांना सांगून सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांनी सकाळी १० वा. आपल्या ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान राबविले . या श्रमदान मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सहभागी होवून माझे गाव व शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता सक्रिय झाले.

यावेळी या स्वच्छता अभियानात हालीवली सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे , उपसरपंच केतन बोराडे , सदस्य दत्ता मणेर , दर्शना बोराडे , सुवर्णा बोराडे , सोनम जाधव , ग्रामसेवक गणेश बडे , कर्मचारी सोपान बोराडे , मनोहर बोराडे , रा.जि.प.शाळा हालिवली मुख्याध्यापक म्हात्रे सर , शिक्षक पाटील सर , अंगणवाडी शिक्षिका सुलभा घाडगे , साक्षी काळभोर , सपना राणे , रेवती बोराडे , ग्रामस्थ – भगवान पाटील , विकास बोराडे , जनार्दन राणे , बामणे दादा , अजय काळभोर तसेच किरवली श्री स्वामी समर्थ बैठकीचे शरद पवार व त्यांचे सर्व सहकारी श्री सदस्य उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page