if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसे गाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) वाढदिवस सर्वच साजरे करतात पण त्यादिवशी आपण काय सामाजिक कार्य करतो , यातूनच आपल्याला आनंद घेता येत असतो . ” आपण हि या समाजाचे देणे आहोत ” , वाढदिवस तर एक निमित्त मात्र असते , परंतु सामाजिक कार्य करून साजरा केलेला वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी होत असतो.असाच उद्दात हेतू घेवून कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते कांचन संजयभाई सुर्वे यांचा वाढदिवस कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या ” कोंढाणे लेणी ” येथे शिल्पकार मित्र मंडळ – गुंडगे या मंडळाचे पदाधिकारी व बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य करत साफसफाई करून राष्ट्रव्यापी कार्य केले.
आज बुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी पोर्णिमेच्या दिवशी शिल्पकार युवक मंडळ – गुंडगे चे सदस्य असलेले कु.कांचन संजयभाई सुर्वे यांच्या वाढदिवशी त्यांनी शिल्पकार युवक मंडळातील सदस्यां कडे एक इच्छा व्यक्त केली की , त्यांना त्यांचा वाढदिवस कर्जत तालुक्यातील ” ऐतिहासिक कोंढाणे बुद्ध लेणी ” येथे भेट देऊन तेथील परिसराची साफसफाई करायची आहे. अर्थातच आंबेडकरी चळवळीची परंपरा त्यांना लाभली असल्याने , त्यांनी ही इच्छा व्यक्त केली,आणि त्वरितच शिल्पकार युवक मंडळाच्या सदस्यांनी त्यांच्या या इच्छेला दुजोरा देत लागलीच त्यांच्या समवेत बी.एस.पी. च्या कार्यकर्त्यांनी कोंढाणे लेणी इथे मार्गक्रमण करत लेणी व तेथील परिसराची साफसफाई केली.
शिल्पकार युवक मंडळाच्या सदस्यांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला असून आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे आपणच जतन केले पाहिजे , असे वक्तव्य यावेळी सर्व सदस्यांनी केले.
या राष्ट्रव्यापी कार्यात शिल्पकार युवक मंडळाचे उपाध्यक्ष अमोल साळवी, बहुजन समाज पार्टी कर्जत शहर अध्यक्ष व शिल्पकार युवक मंडळाचे सदस्य जीतरत्न जाधव, बामसेफ कर्जत संयोजक व शिल्पकार युवक मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत गायकवाड , तसेच कांचन संजयभाई सुर्वे, सुशांत मोरे , रोहन मोरे , प्रफुल्ल मोरे , रुपेश घोडके , चिराग तलकरी, अजिंक्य साळवी , आकाश देसाई , सनी काकडे हे सर्व शिल्पकार युवक मंडळाचे सदस्य यांनी सहभाग घेत सदर ” ऐतिहासिक कोंढाणे लेणी ” परिसराची स्वच्छता मोहिम यशस्वी केली .त्यामुळे त्यांचे कर्जत तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.