लोणावळा : ऑक्झीलियम स्कूलच्या शिक्षक वर्गाने दिली लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोला भेट.टाकाऊ पासून टिकाऊ अंतर्गत अप्रतिम उपक्रमातून प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केला बसण्याचा बाकडा.
लोणावळा येथील ऑक्सिलियम कॉन्व्हेंट विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर शिला मॅडम, पर्यावरण शिक्षीका युनिटा मॅडम व चेन्नई, गुजरात, कर्नाटका या विविध राज्यातून ऑक्झीलियम संस्थेच्या माध्यमातून लोणावळा येथे घनकचरा व्यवस्थापन अभ्यास दौ-याकरीता नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपोला दिनांक 20 रोजी भेट दिली.
तसेच ऑक्झीलियम कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर शिला यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्टीमध्ये विध्यार्थीनींनी व शिक्षिका युनिटा आणि शिक्षिका आस्मा यांनी विटांचा वापर न करता फक्त सिमेंट व प्लास्टीक बॉटल मध्ये शाळेच्या आवारात बसण्यासाठी कट्टा तयार केला आहे.हा कट्टा अप्रतिम असून यावर आकर्षक सजावट केली आहे.प्लास्टीक बॉटलाचा पुर्नवापर विविध पध्दतीने करता येवू शकतो हे शाळेतील विदयार्थीनीनी व शिक्षीका यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.