कर्जत वार्ताहर.
दि. ८ कर्जततालुक्यातील 2014 पासून ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना सातबारा आणि फेरफार उतारा मिळू लागले आहे.त्यासाठी महसूल विभाग तलाठी खात्यात यांच्या कार्यालया कडून घेणायत येणारी फी,2014 तलाठी कार्यालयाकडून शासनाला जमा झालेली नाही,सदरहून फी शासनाच्या खात्यात जमा व्हावी याकरिता पोलीस मित्र संघटनेने 7 डिसेंबर पासून आमरण आत्मदहन उपोषण सुरू केले होते.या दरम्यान उपोषणच्या दुसऱ्या दिवशी महसूल विभागाने सदर फी येत्या महिनाभरात फी शासन जमा केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी 2014 पासून 2019 पर्यंत घेण्यात येणारी फीची रक्कम प्राप्त झाली नसल्याने रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली पोलीस मित्र संघटनेने आवाज उठविला आहे.जानेवारी 2019 पासून या प्रश्नच्या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर शासन या बाबत कोणतेही निर्णय घेतला नाही,कर्जत तहसीलदार कार्यालयावर कडून कोणत्याही कार्यवाही करण्यात आले नाही,याप्रकरणी होत नसल्याने कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयाकडे पोलीस मित्र संघटनेने दाद मागितली होती.
यादरम्यान कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्या पुढाकाराने दीड दिवस सुरू असलेले उपोषण 8डिसेंबर स्थगित करणयात आले आहे उपोषण कर्त्याला महसूल विभागाने लेखी पत्रात 2014 पासून कर्जततालुक्यातील तलाठी सज्जा यांच्या कडून देण्यात आलेल्या दाखले यांची स्वीकारलेली फी याबाबत तपशी शासनाकडे आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक दाखल्यामागे घेतले जाणार 15 रुपये यांच्यापैकी 5 रुपये पुढील महिन्यात जमा केले जाईल,कर्जत प्रांत अधिकारी कार्यलसमोर कर्जत तालुक्यातील नायब तहसीदार यांनी निवेदन देऊन व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण भोर यांच्या हस्ते आमरण उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी पोलीस मित्र संघटनेचे नवी दिल्ली भारत राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी,प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील,प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार चंदन,जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे,महासचिव रमेश कदम,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,उपाध्यक्ष दशरात मुने, जिल्हा सचिव सुप्रेश साळोखे, तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे,सेल उपाध्यक्ष शांताराम मुरकुटे,शहर अध्यक्ष राजेश पवार,खालापूर ता अध्यक्ष संदीप ठाकरे व मान्यवर इत्यादी आदिसह पदाधिकरी उपस्थित होते.