Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऑन लाईन सर्व्हेत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचाच बोलबाला..

ऑन लाईन सर्व्हेत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचाच बोलबाला..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) येणाऱ्या ऑक्टोंबर २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत खालापूर मतदार संघाचा आमदार कोण होणार ? याचा नुकताच ऑन लाईन सर्व्हे सोशल मीडिया वर करण्यात आला , यांत विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याच नावाचा ” बोलबाला ” असून त्यांना ५० टक्के च्या आसपास मते मिळाली आहेत . त्यामुळे खरोखरच ते पुढचे आमदार असून पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ थोरवे पार्ट – २ पहाण्यास मिळणार आहे का ? याची चर्चा मात्र या कर्जत खालापूर मतदार संघात ऐकण्यास मिळत आहे.

आमदार महेंद्र शेठ थोरवे हे एक महत्त्वाकांक्षी नेते म्हणून शिवसेनेत ओळखले जातात . झटपट निर्णय घेण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही , म्हणूनच मिळालेल्या संधीचे सोने करणे , घेतलेला निर्णय हाच योग्य आहे , असे त्यांचे काम करण्याचे समीकरण असल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर त्यांच्या कार्याची आगेकूच सुरू आहे . आपल्या मतदार संघात १ हजार करोड रुपयांचा निधी आणून ” गाव तिथे विकास ” घडवून त्यांनी हा मतदार संघ ” नंबर वन ” बनविले आहे.

संघटन कौशल्य त्यांच्या अंगी असल्याने आज कर्जत खालापूर मतदार संघात सर्वार्धिक कार्यकर्ते त्यांच्या कार्य कौशल्याच्या जोरावर पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत . विकास कामे करताना कुठल्याही प्रभागावर अन्याय न करता सर्व गावांत विकास कामे घडवून आणली आहेत . त्यामुळे त्या गावात विरोधक जरी रहात असले तरी तिथे विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने त्यांचे कार्य ” न भूतो न भविष्यती ” असेच सर्वाँना पहाण्यास मिळत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा आमदार झाल्यास त्यांच्या विकास कार्याचा ” पार्ट – २ ” पहाण्यास मिळणार असून अनेक नवनवीन संकल्प करण्याचा त्यांचा मानस असून अजून नंदनवन घडवून हा मतदार संघ त्यांच्या ” संकल्पनेतून ” उभा राहून महाराष्ट्राच्या नकाशावर ” सुवर्ण अक्षरात ” नोंदला जाईल , यांत शंकाच नसेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page