Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया एस सी - एस टी रेल्वे एम्प्लोइज असो. च्या वतीने...

ऑल इंडिया एस सी – एस टी रेल्वे एम्प्लोइज असो. च्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर शिव जयंती उत्साहात साजरी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) बहुजन प्रतिपालक , कुलवाड़ी भूषण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी २०२४ रोजी ३९४ व्या जयंती निमित्त कर्जत रेल्वे स्थानकावर ऑल इंडिया एस सी – एस टी रेल्वे एम्प्लोइज असो. च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांनी महापुरुषांना अभिवादन केले.

यावेळी या अभिवादन कार्यक्रमास कर्जत न. प. चे प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , कर्जत स्थानक प्रबंधक श्री संतलाल साहेब , सि बि एस आयु. एस. निकाळजे साहेब , ज्येष्ठ सभासद सुनील चव्हाण , तसेच ऑपरेटिंग विभाग , सी एन्ड डब्लू विभाग , इलेक्ट्रिक विभाग , कमर्शियल विभाग तसेच कर्जत – नेरळ शाखेचे अध्यक्ष आयु. अशोक आल्हाट , खजिनदार आयु. राजेश अंसारी , सचिव आयु. हरेश जगताप तसेच सदस्य आयु राजेश तायडे , आयु नितेश मोरे , श्री अमोल तुरडे , शेषराव घोरपडे व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थिति दर्शवली.
- Advertisment -

You cannot copy content of this page