मावळ (प्रतिनिधी):ओव्हळे नाही तर ओवळे असे गावाच्या नावात ग्रामपंचायत प्रशासनाने बदल करावा यासाठी श्री.म्हसोबाभक्त व शिवभक्त-अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने दि.10 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
मावळ तालुक्यातील ओवळे ग्रामपंचायत चे नाव हे ग्रामपंचायत ओवळे असे आहे.परंतु ओवळे गावातील ग्रामपंचायत प्रशासन गावातील जनतेस ग्रामपंचायत मधून कागदपत्र देत असताना त्यावर ग्रामपंचायत च्या नावाचा उल्लेख ओवळे असा न करता ओव्हळे असा करत आहे.
गावातील त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी श्री. म्हसोबाभक्त व शिवभक्त-अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने येत्या 10 नोव्हेंबर 2023 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिवभक्त-अजित शिंदे यांनी दिली.