![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
प्रतिनिधी – श्रावणी कामत.
लोणावळा शहरातील ओव्हन फ्रेश हॉटेलमधील काही कामगारांनी आपले थकीत पगार दिले जात नसल्याची तक्रार मनसेच्या लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्याकडे केली होती. संबंधित कामगारांनी यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांकडे धाव घेतली होती, मात्र कुठेही त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३ ऑगस्ट २०२५ रोजी हॉटेल प्रशासनाला पगार न दिल्यास हॉटेल बंद करण्याचा इशारा देण्यात आला. या कारवाईनंतर तात्काळ पावले उचलत ४ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित हॉटेल प्रशासनाने सर्व कामगारांचा पगार ऑनलाईन पद्धतीने अदा केला.
कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळाल्यानंतर त्यांनी मनसेचे आभार मानले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष निखिल भोसले, प्रवक्ते अमित भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, सुनील सोनवणे, जुबेर मुल्ला, सुभाष रेड्डी, कैवल्य जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“मनसेकडे दाद मागितल्यानंतर पक्ष न्याय देतो” असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला असून, मनसेच्या कार्यपद्धतीमुळे लोणावळा शहरात पक्षाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. परिणामी, आगामी नगर परिषद निवडणुकीत मनसेचा उमेदवार विजयी व्हावा, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.