if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कर्जतमध्ये कॉम्प टेक कॉम्प्युटर एज्युकेशनचे जितेंद्र माळी सरांचा स्तुत्य उपक्रम !
भिसेगाव – कर्जत (सुभाष सोनावणे) जगात मान दिल्यानेच मान मिळत असतो , लहान थोरांची इज्जत करणे , ही भारतीय संस्कृती असून हे कुठल्या शाळेत शिकविले जात नसून ते गुण रक्तातच असतात . आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या धावपळीचे युगात जग कितीही बदलत असले तरी मराठी बाणा , मराठी संस्कृती , व शिक्षणांचे धडे यातूनच तुमची वागण्याची पद्धत तुमच्या ” पर्सनीटी ” ची शोभा वाढवत असते.पण यातूनही काही अशोभनीय कृत्य करून व बोलून आपले संस्कार कसे आहेत , हे दाखविण्याचे काम करत असतात.
हेच धडे आजच्या तरुणाईला तसेच नागरिकांना दाखविण्याचे काम कॉम्प् टेक कॉम्प्युटर एज्युकेशनचे सर्वेसर्वा जितेंद्र माळी सर कर्जतमध्ये करत आहेत.रात्री बेरात्री महिला , जेष्ठ नागरिक , कॉलेज चे तरुणाई , विद्यार्थी तर सर्वसामान्य नागरिकांना आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे काम आजच्या घडीला रिक्षाचालक करतात . पण त्यांना आजची पिढी ” ये रिक्षावाला ” अशी एकेरी भाषा वापरून आवाज देत असतात . वयोवृद्ध , किंवा तरुणाई पेक्षा वडीलधारे असणारे रिक्षाचालकांस असे कुणी बोललेले अपराधी पणाचे वाटते.
आपण प्रवाश्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवतो , कायदा व्यवस्था , गुन्हे नियंत्रित ठेवण्या कामी पोलीस विभागाची मदत करतो , अपघात झाला असल्यास जखमी व्यक्तीस तातडीने रुग्णालयात पोहचवून जीव वाचवतो , कुणाची परिक्षा असो , कुणाची इंटरव्ह्यू असो , कुणाची लग्नाला , विशेष कार्यक्रमाला पोहोचण्याची घाई , मात्र ” ये रिक्षावाला ” आवाज देऊनही न रागावता , हसतमुख होऊन , ” बोला साहेब , कुठे जायचे आहे , हे अदबीने विचारणारे रिक्षाचालक मनातून मात्र नाराज असतो , आणि म्हणूनच आम्हालाही अदबीने बोला , असे अनेक कार्यक्रमातून व्यथा मांडणारे रिक्षाचालक आपण पाहिले असतील.
हाच उद्दात हेतू आपल्या रायगड जिल्ह्यात , कर्जत तालुक्यात व कर्जत नगरीत पोहोचविण्यासाठी कॉम्प् टेक कॉम्प्युटर एज्युकेशनचे मालक जितेंद्र माळी सर यांनी कर्जत शहरातील प्रत्येक रिक्षा स्टँड , तसेच कर्जत रेल्वे तीन चाकी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा कर्जत नगर परिषदेचे प्रथम उपनगराध्यक्ष व विजयाची हैट्रिक मारणारे मा. नगरसेवक उत्तमभाई जाधव यांची प्रतिक्रिया घेऊन , प्रवासी वर्गात , आपल्या क्लासमध्ये व शाळेत , कार्यालयात , गाव , प्रभागात सन्माननीय रिक्षा चालकांना ” ओ रिक्षावाले दादा ” अशी साद घाला , हा सर्वोत्तम उपक्रम हाती घेऊन त्याचा प्रचार – प्रसार करत आहेत.
त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवाळीला शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाळेत जाऊन , खाजगी क्लास मधील विद्यार्थी , कॉलेज तरुण – तरुणी यांना तसेच फुटपाथ वरील भाजी विक्रेते , छोटे मोठे दुकानदार , पणती , आकाश कंदील विकणारे विक्रेत्यांना सुगंधी उटणे पाकिटाचे मोफत वाटप जितेंद्र माळी सर यांनी करून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत . नेहमीच शालेय विद्यार्थ्यांसाठी व कर्जतकरांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा हातखंडा असणाऱ्या त्यांच्या या कॉम्प् टेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या या स्तुत्य उपक्रमाची व जितेंद्र माळी सरांची सर्वत्र स्तुती होत आहे.