Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाऔढोली येथे आढळले तीन फुटी अजगराचे पिल्लू,वन्य जीव रक्षकाकडून त्याची सुखरूप जंगलात...

औढोली येथे आढळले तीन फुटी अजगराचे पिल्लू,वन्य जीव रक्षकाकडून त्याची सुखरूप जंगलात रवानगी..

लोणावळा (प्रतिनिधी: औंढोली गावातील एका बंगल्याच्या गार्डन मध्ये भारतीय आजगराचे तीन फुटी पिल्लु पकडण्यास वन्यजीव रक्षक संस्थेस यश आले आहे.
औंढोली मावळ या गावात एका बंगल्यात साप असल्याचा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना फोन आला की बंगल्यात एक मोठा साप आहे. हातातील काम सोडुन मोरेश्वर मांडेकर हे लगेच साप पकडण्यासाठी निघाले बंगला शोधत शोधत ते त्या बंगल्या जवळ पोचले, नंतर माळी काम करणारे मामा यांनी मोरेश्वर यांना साप दाखवला तसेच मोरेश्वर यांनी तेथील जमलेल्या नागरीकांना सांगितले की हा बिन विषारी साप आहे भारतीय आजगर आहे.तो काहीही करत नाही.

त्यांनी त्या आजारास पकडून ठेवले व तशी माहीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे व वन अधीकारी हनुमंत जाधव या दोघांना दिली तसेच साप चांगला असल्यामुळे त्या आजगरास त्याच्या आदिवासात सोडण्यास सांगितले. त्यावेळी मोरेश्वर मांडेकर यांनी लगेच जाऊन आजगरास जंगलात सोडुन दिले.मागील दहा दिवसांपूर्वी या ठिकाणी आठ फुटी अजगर सापडला होता आज त्याठिकाणी हे तीन फुटी पिल्लू सापडले आहे.
“कुठेही वन्यप्राणी आढळून आल्यास त्याची माहीती वन विभाग टोल फ्री नंबर 1926 किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था क्र.9822555004 यावर संपर्क साधावा,अथवा जवळ पास असणारे प्राणी मीत्र यांना फोन करावा व व्यवस्थीत माहीती द्यावी कारण आपल्या एका फोनमुळे वन्य प्राण्याचा जीव वाचू शकतो.अशी विनंती वन्यजिव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी केली आहे.”
- Advertisment -

You cannot copy content of this page