Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकडाव मधील असंख्य तरुणांचा वंचित मध्ये जाहिर प्रवेश !

कडाव मधील असंख्य तरुणांचा वंचित मध्ये जाहिर प्रवेश !

कर्जत तालुक्यात गाव तिथे शाखा करून झंझावात सुरूच ठेवणार – तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांचा संकल्प…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) बहुजनांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आद दिपकदादा मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन , व अचूक नियोजन करून संघर्षाची धार जिवंत ठेवणारे तरुण नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन आज कडाव मधील असंख्य तरुणानी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षापासून कर्जत मधील सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडी सोडवण्यात आघाडीवर आहेत , आणि प्रत्येक प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी रस्यावर उतरुन आंदोलने, निवेदन , अधिकारी वर्गाबरोबर बैठका घेऊन अनेक प्रश्न तडीस लावले आहेत. त्यामुळे तालुक्यात तरुणांचे वंचित बहुजन आघाडीत काम करण्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
संपुर्ण तालुक्यात वंचित तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या गावोगावी शाखेचे उदघाटन होत आहे. यामध्ये तरुणाचं आकर्षण खुप मोठे आहे. त्यामुळे येणा-या काळात वंचित बहुजन आघाडी हा कर्जत तालुक्यात तरुणांचा पक्ष म्हणुन उदयास येईल , हि काळ्या दगडावरची रेघ असेल. यावेळेस वंचित मध्ये, हरेश गायकवाड,,आकाश शिंदे, अजय पवार, प्रणित पवार, साईनाथ गायकवाड, संजय जाधव, दर्शन जाधव, विलास शिंदे, तानाजी शिंदे,जनार्धन पवार, प्रवीण गायकवाड, संदीप मोरे,प्रतीक जाधव,राकेश आढाव, नयन शिंदे,ऋषिकेश दूधवडे आदी बहुसंख्य तरुणांनी प्रवेश केला.
कडाव येथील शाखेचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते आद. दिपकदादा मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळेस तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे,जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, जिल्हा सचिव अनिल गवळे, जिल्हा संघटक सुनिल आप्पा गायकवाड, ता. महासचिव प्रदीप ढोले,शहर अध्यक्ष लोकेश यादव,तालुका उपाध्यक्ष निलेश पवार,समीर आढाव ,राजू ढोले, अशोक कदम, विकी जाधव, शैलेश खोब्रागडे , प्रदीप गायकवाड,रोशन शिंदे,अनिकेत गायकवाड, कमलाकर जाधव,आदी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळेस स्थानिक नागरिक सुद्धा खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचितच्या झंझावाताने तालुक्यात त्यांची ताकद वाढली असून भविष्यात गाव तिथे वंचितची शाखा असेल , असे मत वंचितचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page