Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमावळकत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या एकूण 120 जानावरांची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका ,तीन आरोपी...

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या एकूण 120 जानावरांची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका ,तीन आरोपी जेरबंद..

मावळ (प्रतिनिधी):आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बेल्हे या गावी अवैद्यरित्या कत्तल करण्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेल्या 120 जानावरांची स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून सुटका केली आहे.
याप्रकरणी आरोपी 1)अल्ताब हमीद व्यापारी (वय वर्ष 48, रा.मुक्ताबाई चौक,बेल्हे जिल्हा पूणे 2)हसिफ शरीफ व्यापारी (वय 36, रा. पेठ आळी बेल्हे जिल्हा पुणे 3)कल्पेश रौफ कुरेशी (वय 19,रा. पेठ आळी,बेल्हे जिल्हा पुणे) या तिन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कार्यवाही साठी आळेफाटा पोलीस स्टेशन च्या स्वाधीन केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेला दि.11 जानेवारी रोजी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या बातमी नुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील बेल्हे या गावी अवैधरित्या 116 वासरू व 4 गायी अशी एकूण 120 जनावरे कत्तलीच्या उद्देशाने त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे दोरखंडाणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली. त्या जानावरांना ताब्यात घेत त्याठिकाणी मिळालेल्या वरील तीन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेने आळेफाटा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर, व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई अभिजित सावंत,सहा पो फौ प्रकाश वाघमारे, सहा पो फौ तुषार पंधारे, पोहवा दिपक साबळे, पोहवा विक्रम तापकीर, पो हवा जनार्धन शेळके, पो हवा योगेश नागरगोजे,पो हवा मंगेश थिगळे,पो ना संदीप वारे ,अक्षय नवले ,दगडू वीरकर तसेच आळेफाटा पोस्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व नारायणगाव पो स्टे चे सपोनि महादेव शेलार व स्टाफ यांनी ही कारवाई केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page