भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे)राज्यात कोरोना व ओमीक्रोन संसर्ग महामारीच्या रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरूवात झाली.कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे देखील आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज होऊन लसीकरणाला सुरुवात झाली.यावेळी कोरोना लस घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थींना कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी गुलाबाचं पुष्प देऊन लसीकरण घेतल्याने शुभेच्छा दिल्या.
कर्जत तालुक्यातील १५ ते १८ वर्ष या वयोगटातील मुला-मुलींनी लस घेऊन लसीकरण मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देवून स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचेही कोरोनापासून संरक्षण करण्याचे आवाहन यावेळी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी करून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांना भिसेगाव – गुंडगे येथे लसीकरण शिबिर लावण्या संबंधी विनंती निवेदन पत्राद्वारे केली.
भिसेगाव प्रभागातील नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी सन २०१९ पासून कोरोना महामारी , अतिवृष्टी , अवकाळी पाऊस , महापूर , वादळ वारा , या संकटात नागरिकांना सहकार्य करून धीर दिला . अन्न – धान्य वाटप , नागरिकांना आरोग्य सेवेत मदत ,ग्रामस्थांना लसीकरण करून घेण्यास कशेळे रुग्णालयात घेऊन जाणे , कोरोना काळात प्रभागातील सुरक्षा व्यवस्था , कचरा निर्मूलीकरण करून परिसरात स्वच्छता , फवारणी , भिसेगावात सॅनिटायझर स्टँड , कोरोना काळात प्रभागात भाजी पाल्याची सोय , कोरोना लसीकरण शिबीर , या सर्व कार्यात पुढाकार व हिरीरीने भाग घेऊन भिसेगाव तरुण मित्र मंडळ , पोलीस पाटील , ग्रामस्थ व महिला मंडळाच्या मदतीने नागरिकांची सुरक्षा केली आहे . म्हणूनच आताही १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचा शिबिर लावून भिसेगाव व गुंडगे येथे कोरोना हद्दपार करण्यासाठी त्यांनी संकल्प केला असल्याचे डॉ . मनोज बनसोडे यांना निवेदनाद्वारे शिबिराची मागणी केली आहे.
आज स्वतः कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नगरसेवक सोमनाथ ठोंबरे उपस्थित राहून लस घेणाऱ्या मुला – मुलींना गुलाब पुष्प देऊन लसीकरणाच्या या देशव्यापी कार्यात प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या . व इतर सर्व १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींनी लस घ्यावी , असे आवाहन कर्जत नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी केले .यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे , डॉ. संगीता दळवी व लसीकरण टिम ला देखील नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी गुलाब पुष्प दिले.