Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " ईद - ए - मिलाद " निमित्त मुस्लिम बांधवांनी रक्तदान...

कर्जतमध्ये ” ईद – ए – मिलाद ” निमित्त मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबिर घेवून केले देशव्यापी कार्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) इस्लाम धर्माचे संस्थापक ” मोहम्मद पैगंबर ” ( हजरत मोहम्मद मो. पैगंबर सल्ल हु अल्ला अलैहु सल्लम ) यांच्या जयंती निमित्त ( इद ए मिलाद ) या पवित्र दिनी दान करण्याची परंपरा असल्याने यावेळी कर्जत नगरीत ” सर्व धर्म समभावाचे ” नेहमीच असलेले वातावरण आनंदित रहाण्यासाठी मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून देशव्यापी कार्य केले.

कर्जत- खालापूर तालुक्यातील ४८१ वे भव्य रक्तदान शिबिर ” इद ए मिलाद ” या पवित्र दिनी गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ” मुस्लिम मस्जिद कर्जत ” येथे आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून , सामाजिक – राष्ट्रीय व मानवतावादी कार्य करून सहकार्य केले.

याप्रसंगी रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील ” समर्पण रक्त केंद्र ” यांचे डॉ. रमेश सिंह , लक्ष्मण नाईक काका , प्रकाश येवले , लता देशक , वाजीद अली , साहिल पवार , निखिल मौर्या, अनिकेत जाधव , राणी मोरे ,संजय ठोंबरे , सायली व इतर सहकाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले.

आज ” गणेश चतुर्दशी ” , गणपती बाप्पाचे विसर्जन व मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ” ईद ए मिलाद ” एकाच दिवशी आल्याने कर्जत शहरात शांतता राखून पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे हेतूने आज मुस्लिम समाजाने मिरवणूक रद्द करून ” सर्व धर्म समभावाचे ” चित्र येथे निर्माण केले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम नेहमीच सर्व समाजात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारे शिवभक्त – नदीम भाई खान , सैद शेख , निसार करीम शेख, हैदर शेख , रहिम मुल्ला , नदीम कुरैशी, हमीद खैराट , एजाज मुल्ला , इम्रान मुल्ला , नवाज तांबोली , अमीर मनियार , इस्माईल दिवाण , नईम ईदरुस, फारुक मुल्ला , शकील शेख , शादाब शेख , खुदबुद्दीन शेख , हमीद अन्सारी, नईम खान , फिरोज शेख , वसीम सिध्दीकी , रशीद मुल्ला , फरान चौगुले , मोसिन कोतवाल , बिलाल आढाळ, त्याचप्रमाणे अनेक मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले.यावेळी रक्तदान शिबिर संयोजक – रायगड भूषण – सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी सर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले .श्री गणेश ठोसर काका यांनी ११५ व्या वेळा रक्तदान केल्याने त्यांचे विशेष आभार करण्यात आले . याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र घरड यांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page