Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण !

कर्जतमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आज कर्जतची भूमी खऱ्या अर्थाने पावन झाली . ” ऐतिहासिक वास्तूंचा ” ठेवा उभारून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले . आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारणारे प. पू. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , प्रती आळंदीत ५२ फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती , इतिहास काळातील दगडांनी सजलेले राजमाता जिजाऊ उद्यान , छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक , तर कर्जत तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामांसाठी होणारी फरफट पाहून एकाच प्रशासकीय इमारतीत त्यांची कामे व्हावीत , म्हणून विविध शासकीय कार्यालये असलेली भव्य दिव्य प्रशासकीय इमारत , महाराष्ट्र भूषण भजन सम्राट गजानन बुवा पाटील सभागृह यांचे भूमिपूजन ,असे एक ना अनेक लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणारा कार्यक्रम , या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार बनण्यास श्री सदस्य , वारकरी संप्रदाय , शिवप्रेमी , तर भजन किर्तनकार त्याचप्रमाणे कर्जतकर नागरिक हा भव्य दिव्य सोहळा व ” न भूतो न भविष्यती ” अशी ऐतिहासिक सभा बघुन , ओ शेठ….तुम्ही नादच केलाय थेट ” असा सूर सर्वांच्याच मुखातून आज ऐकण्यास मिळाला.

यावेळी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खूप भावनिक होवून विचार मांडताना म्हणाले की , हा विकास नाही , तर हा विचारांचा वारसा आहे , पुढील पिढीस हा अनमोल ठेवा आहे , करोडो रुपयांचा निधी साहेबांनी मंजूर केला , म्हणूनच हा विकास साधू शकलो , साहेबांची ” शाबासकीची थाप ” हीच आम्हास सर्वस्वी आहे , आज २७२ कोटी रूपयांचे लोकार्पण व भूमिपूजन झालेले आहे , हा मतदार संघ ” बाळासाहेबांच्या ” विचाराने प्रेरित झालेला आहे , यावेळी त्यांनी २० जून चां प्रसंग सांगितला , साहेबांचा आदेश म्हणून आम्ही सुरतला निघालो , तिथे पोहचल्यावर साहेब नाराज व दुःखी दिसले , पण मी त्यांना सांगितले , आम्ही तुमच्या सोबत ठाम व कायम आहोत , बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार ” जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका , कारण मागे फिरणारे कधीच इतिहास घडवू शकत नाही , म्हणूनच आज महाराष्ट्राचे कडवट शिवसैनिक शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आहेत , त्यावेळी आम्ही आनंदोत्सव साजरा केला , मात्र विरोधकांनी त्याला वेगळे वळण लावले , यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे पेण अर्बन बँकेचा तिढा सोडवावा या प्रमुख मागणी सह कर्जतची पाणी योजनेसाठी ५४ कोटिंची मागणी , भिसेगाव – कर्जत भुयारी रस्ता , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन साठी ५ कोटिंची मागणी , कोयना गावातील प्रकल्पाचे प्रश्न सोडवावे , कर्जतमध्ये १०० खाटांचे हॉस्पिटल बनवावे , या मागण्या केल्या . ही सभा अभूतपूर्व नाही तर ” ऐतिहासिक सभा ” अशी ” न भूतो – न भविष्यती झालेली दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वागत कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे तसेच खासदार आप्पासाहेब बारणे , जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर ,संघटक पंकज पाटील , शिवराम बदे , मा. सभापती मनोहर दादा थोरवे , नगरसेवक संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम भाई खान, त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेल्या कार्याचे ” विकासाचा महामेरू ” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अनेकांचा पक्ष प्रवेश देखील झाला .यावेळी व्यासपीठावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार सदाभाऊ सरवणकर, ह.भ.प. दादा महाराज राणे, ह.भ.प. रामदास महाराज पाटील, ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जाधव, ह.भ.प. रामदास महाराज सावंत, ह.भ.प. भरत महाराज देशमुख, ह.भ.प. रामचंद्र महाराज पिंगळे, ह.भ.प. काशिनाथ महाराज वाघुळे, ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराज मांडे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज येरम, ह.भ.प. कृष्णा महाराज लांबे, ह.भ.प. बळीराम महाराज पवार, ह.भ.प. कैलास महाराज भोईर तसेच या सभेच्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page