Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्जतमध्ये कचऱ्याचे साम्राज्य , हातभर तक्रारीचा - बोटभर उपाय "…

” कर्जतमध्ये कचऱ्याचे साम्राज्य , हातभर तक्रारीचा – बोटभर उपाय “…

” मुख्याधिकारी रामदास कोकरेंना ” जमल ते ” वैभव गारवेंना ” का जमत नाही ? नागरिकांचा संतप्त सवाल !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सध्या कर्जत नगर परिषदेच्या सर्व प्रभागात समस्यांनी काहूर माजलं आहे . प्रभागातील ” कोपरे ” कचऱ्यामुळे गजबजलेले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे . ऐन सणसुदीच्या दिवसांत पावसाची ये – जा होत असल्याने दमट वातावरणात दुर्गंधी पसरली असताना सोशल मीडियावर सर्वत्र बकाल घाणीचे फोटो पसरवून नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत . सर्वत्र कचऱ्याच्या ” हातभर तक्रारीचा – बोटभर उपाय ” असताना पालिकेचे मुख्याधिकारी ” आळी मिळी – गुप चली ” असा रडीचा खेळ ” तोंडावर बोट ” ठेवून गुमान उभे असल्याने ” स्वच्छता कार्यसम्राट मुख्याधिकारी रामदास कोकरे ” यांना जे जमल , ते वैभव गारवे यांना का जमत नाही ? असा संतप्त सवाल करून कर्जत नगर परिषदेच्या या गलथान कारभाराच्या नावाने ” शिमगा ” खेळत असून येथे नागरिकांत संताप खदखदत आहे.

कर्जत नगर परिषदेत एकूण सतरा प्रभाग आहेत . या सतरा प्रभागात आरोग्य विभागात स्वच्छता मोहिमेसाठी कायम स्वरुपी कामगार एकूण ३१ असून त्यात देखरेखीसाठी २ मुकादम , व ७ महिला , पुरुष २२ असे कामगार आहेत , तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर ” क्लीन शिल्ड प्रायव्हेट लिमिटेड ” या कॉन्ट्रॅक्टर कडून एकूण ६४ कामगार असून दहिवली – मुद्रे – भिसेगाव – गुंडगे असे ४ मुकादम , त्यात ९ महिला , व पुरुष ५५ असे कंत्राटी कामगार आहेत . इतका फौजफाटा असताना सर्व प्रभागात घाणीचे साम्राज्य कसे रहाते ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत . कचरा संकलित करण्यासाठी जात असलेले कामगार यांनी ज्या ज्या ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त टाकला जात आहे , तेथील खबर मुकादम व पालिकेचे आरोग्य अधिकारी खाडे यांना देणे गरजेचे वाटते . तर नागरिकांनी देखील घंटा गाडीतच कचरा टाकने , नियमाने असताना असा उघड्यावर का कचरा टाकला जातो , हा देखील एक ” शिस्तप्रिय प्रश्न ” उभा राहिला आहे.

तत्कालीन ” मुख्याधिकारी रामदास कोकरे ” कर्जत न. प. वर कार्यरत असताना त्यांनी सर्व महिला व नागरिकांना सुका कचरा व ओला कचरा घंटा गाडीतच टाका , अन्यथा तुमच्यावर पोलीस केसी होतील , व तश्या केल्या देखील , अशी सूचना असताना सुज्ञ कर्जतकरांना त्याचा विसर पडला की काय ? असा ही प्रश्न निर्माण झाला आहे . जुने एस. टी. स्टँड परिसरात कर्जत रेल्वे स्थानक रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या कोपऱ्यावर अनेक महिन्यांपासून कचरा टाकून ” घाणीचे साम्राज्य ” उभे असताना , नागरिक चुकी करतातच , पण पालिका सुद्घा तो उचलत नसल्याने ” डासांचा प्रादुर्भाव ” वाढत असून कर्जतकर नागरिकांना व प्रवासी वर्गाला ” रोगराईला ” सामोरे जावे लागत आहे . या विरोधात सर्व नागरिक एकत्रित येवून तीव्र व क्रोध स्वरूपाचे आंदोलन छेडणार असताना , आतातरी ” थंडगार असलेले ” मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पालिकेच्या कारभारावर लक्ष केंद्रित करावे , अशी संतप्त मागणी नागरिक करीत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page