Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " डॉ. बाबासाहेब आंबेडकर " यांची १३४ व्या जयंती महोत्सवाला सुरुवात...

कर्जतमध्ये ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांची १३४ व्या जयंती महोत्सवाला सुरुवात !

राहुल युवक मंडळ व यशोधरा महिला मंडळाचा पुढाकार ,राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरातील नावाजलेले राहुल युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक तथा आर पी आय पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुलजी डाळींबकर यांच्या पुढाकाराने व यशोधरा महिला मंडळ यांच्या सहकार्याने ७५ व्या संविधानाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महात्मा ज्योतिबा फुले , संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ पासून कर्जत पोलीस मैदान येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३४ वा भव्य जयंती महोत्सव ११ एप्रिल – १३ एप्रिल – १४ एप्रिल २०२५ रोजी पोलीस मैदान कर्जत येथे भव्य प्रबोधन कार्यक्रम आणि भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा ,भव्य मिरवणूक , भोजन दान असे विविध कार्यक्रमाने साजरी होणार आहे . यानिमित्ताने दिनांक ११ एप्रिल रोजी सायं. ६ -३० वाजता महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील , बुद्ध वंदना व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ” गुणवंत समाज रत्नांचा ” मान्यवरांच्या हस्ते यावेळी शाल – पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रपिता ज्योतीराव फुले जयंती निमित्त मा. वसंतजी कोळंबे साहेब ( इतिहास संशोधक, संविधानाचे अभ्यासक कर्जत ) प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला . यावेळी वसंत कोळंबे सरांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र कथन केले . महात्मा फुले यांनी आपली सर्व ” इस्टेट ” बहुजन समाजाच्या उन्नती साठी लावली . त्यांचे आडनाव गोरे होते पण फुलांचा व्यवसाय करत असल्याने त्यांचे नाव ” फुले ” पडले . देशात यापूर्वी अनेक स्मृती काम पहात होते , त्यात मनु स्मृतीचा प्रभाव जास्त होता . यांत ब्राम्हण – क्षत्रिय – वैश्य या व्यतिरिक्त कुणाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता . मात्र फुलेंनी इंग्रजांच्या मिशनरी स्कूल मधून शिक्षण घेतले . तू माळी समाजाचा असल्याने तुमच्या मुलाने शिक्षण घेऊन काय करणार ? असे त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना सांगितले जायचे . पण त्यांनी शिक्षण घेतले नसते तर ते ” क्रांती वीर ” झाले नसते , म्हणूनच सर्वांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी स्वखर्चाने १८ शाळा काढल्या , यासाठी त्यांना घर सोडावे लागले.
यावर वसंत कोळंबे यांनी प्रकाश टाकला . पहिली ” शिव जयंती ” साजरी करणारे ज्योतिराव फुले आहेत , बहुजनांना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी शिव जयंती साजरी करून केले , ५० वर्षे छत्रपतींची समाधी कुणाला माहीत नव्हती ती त्यांनी रायगडावर जाऊन ३ दिवसांत शोधली व १८७० ला त्यांनी पुण्यात शिवजयंती साजरी केली . लग्न लावण्यासाठी ” सत्य शोधक संघटनेची ” स्थापना केली , त्यांनी दलाल पद्धत बंद केली . कुठलीही व्यक्ती धर्मावर मोठी नसते , तर ती कार्यावर मोठी असते , मोठ्या संख्येने त्यांनी ब्राह्मण भटजी शिवाय सामूहिक लग्न लावली , भटजींना दक्षिणा द्यावी म्हणून १७ वर्षे खूप मोठा लढा लढावा लागला . आताही समाजात ” फुले ” नावाचा सिनेमाचे नाव ठेवून वाद निर्माण करत आहेत , वाघ्या कुत्र्याचा इतिहास नसताना वाद वाढत आहे , याबाबतीत त्यांनी खंत व्यक्त केली.

या महात्मा फुले जयंती निम्मित कार्यक्रमाचे अध्यक्ष के के गाढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . तर प्रस्तावना सतीश देशपांडे , आभार प्रदर्शन अजय डाळिंबकर यांनी केले .सर्वांचे स्वागत मा. दिपकजी भालेराव – सामाजिक कार्यकर्ते, बँक मॅनेजर यांनी केले . यावेळी विचार पिठावर राहुल युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल डाळींबकर , बौद्धचार्य आप्पासाहेब साळवे , गौतम गमरे – ( बौद्धचार्य ), भारतीय बौद्ध महासभा कर्जत तालुका अध्यक्ष बी एच गायकवाड , राहुल युवक मंडळाचे अध्यक्ष अलोक डाळिंबकर , अनिकेत रणदिवे , आदित्य वाघमारे , मयूर रणदिवे , सुरेश जाधव , वैभव कांबळे आदी उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page