आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिल्या सर्वाँना शुभेच्छा…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरात उल्हास नदीच्या तीरावर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ” प्रती पंढरपूर आळंदी ” उभारून या परिसरात ५२ फुटी ” श्री विठ्ठलाची ” मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या ठिकाणी आज देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो श्री विठ्ठल भक्तांनी , महिला भगिनी , आबालवृद्ध , बच्चे कंपनीने दर्शन घेतले . यानिमित्ताने आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने भक्ती संगीत व नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आज बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशी निम्मित सकाळी १० ते १२ भक्ती भजन कार्यक्रम •कर्जत शिक्षण प्रसारक महिला भजनी मंडळ गायिका – सौ सुचिताताई वांजळे (स्व.गजाननबुवा पाटील यांचा कन्या) हार्मोनियम – श्री मधुकर भोईर , तबला – श्री रमेश खरमरे , संध्याकाळी ४ ते ६ भजन भूषण कै . गजानन बुवा पाटील यांचे पट्टशिष्य श्री दिपकबुवा करोडे (कर्जत) यांचे सुश्राव्य भजन पखवाज – श्री आकाश काटे , तर सायं . ६ ते रात्री ८ गायिका निकिता ठोंबरे – वादक ओंकार कराळे , पखवाज – हर्षद ठोंबरे असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठलाचे पुष्प वाहून दर्शन घेतले . माझ्या तमाम कर्जतकरांना व ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही अशा भाविकांसाठी हे प्रती पंढरपूर आळंदी वसविण्यात आल्याचे सांगून सर्व श्री विठ्ठल भक्तांना देवशयनी आषाढी एकादशीच्या त्यांनी सर्वाँना शुभेच्छा दिल्या . यावेळी प्रसाद म्हणून सर्वांना आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला.