भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने राज्यस्तरीय प्रसिध्दी मिळावी व पर्यटकांच्या संख्येत वाढ होवून येथील रोजगाराला गती मिळण्यासाठी आता कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्या ” संकल्पनेतून ” साकारलेल्या ऐतिहासिक प्रती पंढरपूर आळंदी येथील उल्हास नदीच्या तीरावर कोल्हापूर टाईप बंधारा बांधून अडविलेल्या पाण्यात पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता यावा , यासाठी विशेष प्रयत्नातून १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे . त्यांच्या या स्तुत्य संकल्पनेची सर्वत्र वाहवा होत असून बोटिंगची मजा लुटण्यासाठी सर्वच आतुरतेने वाट पहात आहेत.
कर्जत नगर परिषद हद्दीत उल्हास नदीच्या तीरावर बहुचर्चित असलेली ५२ फूट ” श्री विठ्ठलाची ” मूर्ती आणि त्या मूर्तीच्या बाजूने वाहणारी उल्हास नदी या नदीवरती कोल्हापुरी टाईप बंधारा बांधण्याचे काम आमदार महिंद्र शेठ थोरवे यांनी हाती घेतले होते . मान. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या बंधार्यास १ कोटी ६५ लाख इतक्या रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामामुळे कर्जत शहरातील पाणी अडवण्यास मदत होईल आणि याच बंधाऱ्यावरती भविष्यामध्ये बोटिंगची मजा घेतली जाऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी हि स्तुत्य संकल्पना कर्जतकरांसाठी व येणाऱ्या पर्यटकांसाठी राबवली आहे.
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारणाऱ्या या बंधाऱ्याचे व अडविलेल्या पाण्यावर बोटिंगची मजा , या संकल्पनेची सर्वत्र वाहवा होत असून या होणाऱ्या कामाकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.