Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये बौद्ध समाजाचे मुक्ती मोर्चा आंदोलन !

कर्जतमध्ये बौद्ध समाजाचे मुक्ती मोर्चा आंदोलन !

” तथागतांचे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करा..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) बिहार राज्यातील तथागत गौतम बुद्ध यांचे ” बुद्धगया महाबोधी महाविहार ” मुक्त करा , अशी मागणी घेऊन आज मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजाने मुक्ती मोर्चा आंदोलन केले . यावेळी पंचशील ध्वज व बौद्ध भिक्खू यांच्या मार्गदर्शनाखाली येथे तालुक्यातून सफेद वस्त्र परिधान करून नागरिक व महिला भगिनी यां मुक्ती आंदोलनात सामील झाले होते . प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकास पुष्पहार अर्पण करून हा मुक्ती मोर्चा आंदोलन घोषणा देत जुने जकात नाका ते कर्जत बाजार पेठेतून पुढे श्री कपालेश्वर मंदिर पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक येथे येऊन त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मग पुढे प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तर त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात येऊन देशाचे मान. राष्ट्रपती महोदय यांच्या कडे निवेदन पोहचविण्यासाठी त्यांना सांगण्यात आले.

” बुद्धगया महाबोधी महाविहार ” हे संपूर्ण जगातील बौध्द बांधवांच अतिशय महत्वाच ” प्रेरणादायी प्रार्थना स्थळ ” असून त्याला ऐतिहासिक दर्जा आहे . या ठिकाणीच तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले . त्यामुळे देशाबरोबर जगभरातील अनुयायांच्या ” भावना ” याच्याशी जोडल्या आहेत , त्या अनुषंगाने येथील बौद्ध महाविहाराचे ” पावित्र्य ” जपणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे , परंतु ह्या महाविहारामध्ये अनेक अश्या घटना घडत आहेत कि यामुळे विहाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे . बौद्ध धम्म हा ” विज्ञानावर ” आधारित असताना अशा पवित्र ठिकाणी ” अंधश्रध्येला ” खत पाणी घालण्याचे काम बऱ्याच वर्षांपासून होत आहे , आणि हा प्रकार दिवसांदिवेस वाढत चालला आहे , आणि ह्या सर्वांचेच कारण म्हणजे तेथील असलेला ” व्यवस्थापन समिती कायदा 1949 ” हा आहे.
ह्या कायद्यामुळे तेथील व्यवस्थापन समितीतील बौद्धभिक्षु व्यतिरिक्त इतर सदस्य महाविहाराचे अस्तित्व धोक्यात येईल , अशा गोष्टी सातत्याने करीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन तमाम बौद्ध भिक्षुगण आणि बौद्ध बांधव येथे अस्तित्वात असलेला व्यवस्थापन समिती कायदा 1949 रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षुनकडे देण्यात यावे , याकरिता भिक्षुगण गेली २९ दिवस उपोषण करीत आहेत . मात्र याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसून मा.महामाहीम राष्ट्रपती ,भारत सरकार यांचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रांत अधिकारी संकपाळ व कर्जत पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्फत त्यांना निवेदन देण्यात आले.

अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च धम्मस्थान ” महाबोधि महाविहार ” ब्राम्हणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावे. बोधगया टेपल अॅक्ट 1949 रद्द करण्यात यावे , महाबोधि महाविहारात बौद्धिक कर्मकांड करून श्र‌द्धाभावना दुखावणारे पांडे पूरोहित यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तात्काळ येथील आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास देशभरातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील तमाम बौद्ध बांधवांनी दिला आहे . आपले निवेदन मा.राष्ट्रपती व सरकारकडे पोहचवण्याचे आश्वासन मा. प्रांत अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी दिले आहे.यावेळी या मुक्ती मोर्चा आंदोलनात कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष – धार्मिक व शैक्षणिक – सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रातील बौद्ध बांधव , महिला भगिनी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page