Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये मनसेचा " राजभाषा दिनानिमित्त " मी मराठी स्वाक्षरी मराठी मोहीम संपन्न...

कर्जतमध्ये मनसेचा ” राजभाषा दिनानिमित्त ” मी मराठी स्वाक्षरी मराठी मोहीम संपन्न !

शहर प्रमुख ” राजेश साळुंखे ” यांचा पुढाकार…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )महाराष्ट्रात ” मराठी राजभाषा दिन ” खऱ्या अर्थाने कुणी जिवंत ठेवला असेल तर ते ” मराठी -ह्दय सम्राट , महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज साहेब ठाकरे ” यांनी . मराठी भाषा बोलणे , मराठी पाट्या लावणे , मराठी तरुणांना नोकरी , त्यांचे प्रश्न – समस्या सोडविणे , तर याबरोबरच मराठी माणसावर जास्त प्रेम कुणी केले असेल तर ते राज साहेब ठाकरे यांनी , म्हणूनच आजपर्यंत मनसे पदाधिकारी ” मराठी राजभाषा दिन ” महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करतात . या त्यांच्या मोहिमेमुळेच केंद्र सरकारने देखील मराठी भाषेला ” अभिजात दर्जा ” दिला आहे . आज कर्जतमध्ये २७ फेब्रुवारी हा कवी ” कुसुमाग्रज ” यांचा जन्म दिवस मनसे शहर प्रमुख राजेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली व पुढाकाराने ” मराठी राजभाषा ” दिनानिमित्त ” मी मराठी – स्वाक्षरी मराठी ” मोहीम कर्जतमध्ये लोक. टिळक चौकात बॅनर वर मराठी अक्षरात सही , नाव लिहून मराठी भाषा मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

नेहमीच राजसाहेबांचे संपर्कात व त्यांच्या प्रखर विचारांची अंमलबजावणी , त्यांचे आदेश व कार्य आपल्या कृतीतून उतरविण्याचा पुढाकार कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे हे नेहमीच घेत असतात . म्हणूनच महाराष्ट्र नव निर्माण सेना या पक्षाला देखील कर्जतमध्ये नवसंजीवनी देण्याचे काम ते करत आहेत.

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे व युवासेना प्रमुख अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत दादा भवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे यांच्या पुढाकाराने हा मराठी राजभाषा दिवस ” मी मराठी – स्वाक्षरी मराठी ” मोहीम राबवून श्री कपालेश्वर मंदिरा जवळ भला मोठा बॅनर लावून असंख्य कर्जतकरांनी मराठीत स्वाक्षरी करून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करून ” राजभाषा ” जिवंत ठेवली.

यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत दादा भवारे , कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे , हेमंत ठाणगे – मा. नगरसेवक कर्जत न. प. , तालुका सचिव प्रदीप पाटील , युवा सैनिक महेश लोवंशी , हे प्रमुख मनसे पदाधिकारी व असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page