Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये रंगणार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य श्रावणसरी मंगळागौरी स्पर्धा !

कर्जतमध्ये रंगणार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य श्रावणसरी मंगळागौरी स्पर्धा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात अनेक कार्यक्रम यशस्वी रित्या करून आपल्या कार्याचा डंका सर्वदूर पसरवून येणाऱ्या काळात मतदार संघाचे नेतृत्व करण्यास सक्षम चेहरा म्हणून सर्वांसमोर आलेले मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली श्रावण महिन्यातील महिलांचा मंगळागौर कार्यक्रम होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगडचे सर्वेसर्वा , खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे , महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे व आमदार अनिकेत दादा तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
यासाठी सौ. उमा मुंढे अध्यक्षा, रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत महिला तालुका अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , सौ . स्वाती कुमार अध्यक्षा, माथेरान शहर व सौ.राजश्री कोकाटे अध्यक्षा, नेरळ शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी कंबर कसली असून रविवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता , रॉयल गार्डन – कर्जत, जि. रायगड च्या भव्य सभागृहात ” मंगळागौर झिम्मा फुगडी चां ” नाद घुमणार आहे.

मंगळागौर हा सण म्हणजे माहेरवासीणसाठी पारंपारिक नृत्यांचा खेळ असून ” उत्सवाची पर्वणी , आनंदाला गवसणी ” असा असून मनसोक्त आनंद लुटण्यासाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित या खेळात विजेत्या महिलेस ” मानाची पैठणी आणि नथ ” तर उपस्थित महिलांना इतर खेळांमधून १६ आकर्षक बक्षिसे मिळणार असून या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी खास विशेष आकर्षण मराठी मालिकेतील ● भाग्य दिले तू मला , मा. तन्वी मुंडले (कावेरी) , व • स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मा. पूजा बिरारी (पल्लवी ) या उपस्थित राहणार आहेत.

या खेळात प्रथम बक्षीस २२,२२२/- रू . , द्वितीय बक्षीस १५,५५५/- रू . , तृतीय बक्षीस ११,१११/- रू . , चतुर्थ बक्षिस ७,७७७/- रू. , तर उत्तेजनार्थ – ५,५५५/- आदी बक्षिसे असणार आहेत . शिवाय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस मिळणार आकर्षक बक्षिस , त्यामुळे या बहारदार मंगळागौर कार्यक्रमाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे . म्हणूनच या कार्यक्रमास ” न भूतो , न भविष्यती ” अशी महिलांची गर्दी पहाण्यास मिळणार , यांत शंकाच नसेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page