Saturday, June 28, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्जतमध्ये रस्त्यावर , चौकात , कोपऱ्यावर कचराच कचरा "

” कर्जतमध्ये रस्त्यावर , चौकात , कोपऱ्यावर कचराच कचरा “

घंटागाडी आल्यावर ” कचरा न टाकणाऱ्या ” नागरिकांचा ” सर्व्हे ” करून ” कारवाई ” करण्याची गरज

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीत सर्वत्र सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत . अशातच सर्व दवाखाने ताप – थंडी – अंगदुखी या आजाराने हाऊसफुल होत आहेत . हा आजार रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी , चौकात , कोपऱ्यावर , उघड्यावर नागरिक कचरा टाकत असल्याने रोगराई पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे . त्यामुळे अनेक नागरिक आपल्या परिसरात कर्जत नगर परिषदेची ” घंटा गाडी ” आल्यावर कचरा टाकण्यास येत नाहीत , तर तो कचरा उघड्यावर नागरिकांना त्रास , आजार होईल , अश्या ठिकाणी टाकत असल्याने पालिका प्रशासनाने जे नागरिक घंटा गाडीत कचरा टाकत नाहीत अश्या नागरिकांचा सर्व्हे करून त्यांच्यावर कडक ” कारवाई ” करण्याची गरज असल्याची संतप्त मागणी नागरिकांतून होत आहे.


कर्जत न. प . मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी ” रामदास कोकरे ” हे असताना ” सुका व ओला ” कचरा वेगवेगळा करण्याचे नियम येवून नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास त्यांना ” पोलीस कारवाईला ” सामोरे जावे लागत होते , मग मुख्याधिकारी बदली झाल्यावर असे नियम ” बासनात ” गुंडाळले का ? असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत . असा उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण आता सर्व प्रभागात वाढले असून असा कचरा उचलला देखील जात नाही , की जाळला देखील जाऊ शकत नसल्याने पावसामुळे असा घाणेरडा कचऱ्यातून परिसरात ” दुर्गंधी ” पसरत असून त्यावर ” डासांची उत्पत्ती ” मोठ्या प्रमाणात होत आहे . त्यामुळे असा कचरा ” रोगराई ” पसरवण्यास कारणीभूत ठरत आहे .


यावर कर्जत न. प. चे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व प्रशासनाने मोहीम उघडून जे नागरिक आपल्या प्रभागात , परिसरात घंटा गाडी आल्यावर सुका व ओला कचरा टाकण्यास येत नाहीत , अश्या नागरिकांचा सर्व्हे करावा , व अश्या नागरिकांना नोटीस पाठवून सूचित करावे , आणि तरी त्यांनी या नोटीसला जुमानले नाही , तर अश्या ” रोगराई ” पसरवणाऱ्या व आपला परिसर ” अस्वच्छ ” करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करावी , अशी संतप्त मागणी घंटा गाडीत कचरा टाकणारे सुज्ञ नागरिक व छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page