Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस " मंगळागौर " कार्यक्रमास महिलांची अभूतपूर्व गर्दी !

कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस ” मंगळागौर ” कार्यक्रमास महिलांची अभूतपूर्व गर्दी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) बदलापूर , उरण ची घटना निंदनीय असून सर्व महिला भगिनींची रक्षण करण्यास हा त्यांचा ” भाऊ ” समर्थ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका – संघटित व्हा – संघर्ष करा , तर अन्यायाच्या विरोधात लढा हे छत्रपती शिवाजी महाराज यांना सांगणाऱ्या मासाहेब जिजाऊ प्रमाणे प्रत्येक घरात पुन्हा जिजाऊ जन्मास येणे गरजेचे असून बदलापूरच्या घटनेत आरोपीस भर चौकात फाशी होणे गरजेचे असल्याचे , भावनिक मत आज कर्जत शहरात रॉयल गार्डनच्या भव्य सभागृहात सुधाकरभाऊ घारे फाउंडेशन आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित मंगळागौर या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपाध्यक्ष , सभापती शिक्षण – आरोग्य – क्रीडा समिती, राजिप. सुधाकर भाऊ घारे यांनी व्यक्त केले.

यावेळी या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत , प्रदेश सचिव भरत भाई भगत , अशोक शेठ भोपतराव , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , जिल्हा नेते शिवाजी दादा खारीक , सौ. नमिता ताई सुधाकर घारे – खांडपे मा. सरपंच , विधानसभा महिला अध्यक्षा ऍड. पूजा सुर्वे , कर्जत ता .अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , खालापूर अध्यक्षा सुरेखा खेडकर , युवा ता. अध्यक्ष शैलेश पालकर , अरूण हरपुडे , आर के , सौ. मनिषा ठोंबरे , कर्जत शहर अध्यक्ष मधुरा चंदन पाटील , नेरळ शहर अध्यक्षा राजश्री कोकाटे , माथेरान अध्यक्षा स्वाती कुमार , सौ. भारती पालकर , मनिषा पाटील , मनीषा देशमुख , केतन बेलोसे , सुजित भोईर , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनी काम करत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे , अनेकांना आमिषे दाखवीत जात आहेत , पोलीस केस मध्ये फसवत आहेत , मला ही विरोधकांनी स्वतःच रचलेल्या एका महिलेला मोबाईल मध्ये मेसेज करत असल्याच्या खोट्या केस मध्ये फसवायचा प्रयत्न केल्याचा , धक्कादायक खुलासा व्यक्त केला . आजपर्यंत येथील लोकप्रतिनिधींनी येथील महिला भगिनींना काहीही देण्याचे काम केले नाही , फक्त कॉपी करण्याचे कार्यक्रम करतात , मात्र पुढच्या काळात कॉपी चालणार नाही , राष्ट्रवादीचे माझे सर्व सुपर वायझर पदाधिकारी यावेळी त्यांना घरी बसवल्या शिवाय गप्प बसणार नाहीत , अशी कोपरखळी त्यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे नाव न घेता मारली .

यावेळी सुधाकरभाऊ घारे फाउंडेशन आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित ” श्रावणसरी समूह नृत्य स्पर्धा – २०२४ ” शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी रॉयल गार्डन, कर्जत येथे दुपारी ३ वा. मोठ्या उत्साहात महिला भगिनींनी खचाखच भरलेल्या रॉयल गार्डन येथे साजरा झाला . यावेळी कर्जत तालुक्यातील अनेक महिला ग्रुपने सहभाग नोंदवला . अनेकांनी लोकनृत्य, कोळीनृत्य, लावणीनृत्य, आदिवासी नृत्य सादर केले . यावेळी अनेकांना बक्षिसे व आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या . या कार्यक्रमास टिव्ही सिरीयल अभिनेत्री ” रश्मी अनपट ” यांची उपस्थिती आकर्षण ठरली.
- Advertisment -

You cannot copy content of this page