![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
वीज ग्राहक संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्या बरोबरच कर्जत शहरात ऐन ” उन्हाच्या तडाख्यात ” सततच्या वाढत्या ” वीज खंडित ” समस्येमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांचा संयमाचा बांध तुटू लागला आहे . वीज कंपनीवर यामुळे संताप वाढू लागला असून याच पार्श्वभूमीवर ” कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती ” च्या वतीने मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी महावितरण कार्यालयात अचानक ” धडक ” देण्यात आली. या धडक कारवाईने महावितरण प्रशासनाची धांदल उडाली असून, समितीने तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास ” तीव्र आंदोलनाचा ” इशारा यावेळी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहर व परिसरात दिवसाढवळ्या व रात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शहरी भागात विजेचा लपंडाव सुरू आहे . नागरिकांना ऐन गर्मीत विजेअभावी त्रास होत आहे . यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये कर्जत शहर बचाव समितीने साखळी उपोषण करून महावितरणच्या कार्यप्रणालीचा संतप्त निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता केंद्रे यांनी लेखी आश्वासन देत कामे पूर्ण करण्याचे वचन दिले होते. मात्र एप्रिल २०२५ पासून पुन्हा विजेची समस्या वाढली असून, दिलेली आश्वासने ” हवेत विरल्याचे ” चित्र निर्माण झाले आहे . पुन्हा वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.
नागरीकांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. कामांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच एक्सप्रेस फिडर संदर्भात नगरपरिषद प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचा आरोपही समितीने केला आहे. त्यावेळी साखळी उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन अजून संपलेले नाही , जर महावितरणने मे महिन्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत, तर पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र आंदोलन छेडले जाईल , ही धडक मोहीम केवळ सुरुवात आहे, असा इशारा समितीने दिला असून, नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
वीज खंडित होत असल्याने त्याचा परिणाम थेट पाण्यावर होत असून वीज कंपनी आणि पालिका प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे . वीज कंपनी व पालिका प्रशासनाचे हे दोन्ही अधिकारी एकमेकांवर बोट दाखवून आपली बाजू सावरत आहेत. समस्यांचे निवारण न केल्यास याच्या पुढचे आंदोलन हे लोकशाही किंवा सनदशीर मार्गाने नसेल, तर लोकांचा उद्रेक झालेला असेल , यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल , असा संतप्त ईशारा ॲड.कैलास मोरे, यांनी उप कार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे , यांना दिला आहे . यावेळी महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांना संतप्त इशारा देते प्रसंगी संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे , रंजन दातार, राजेश लाड, दीपक बेहरे, हरिश्चंद्र दादा यादव, कृष्णा जाधव, विद्यानंद ओव्हाळ, स्विटी बार्शी, लोकेश यादव, सुनिल मोरे, मुकुंद भागवत आदी सदस्य उपस्थित होते .