![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्याबरोबरच आता रायगड जिल्ह्यात झेप घेतलेली पत्रकारांचा आवाज उठवणारी , नागरिकांच्या अन्याय अत्याचारा विरोधात लेखणीचा वार करून न्याय देणारी , नागरिक व प्रशासकीय यंत्रणेत समतोल राखून न्याय निवाडा करणारी , लोकशाहीचा खऱ्या अर्थाने चौथा स्तंभ असणारी , ” सब से तेज ” व्हॉईस ऑफ मिडिया या राज्यस्तरीय पत्रकारांच्या संघटनेचे ” रोपटे ” कर्जत तालुक्यात जिल्हाध्यक्ष अभिजित दरेकर व जिल्हा कार्याध्यक्ष संकेत घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आले.
आज रविवार दिनांक ०९ मार्च २०२५ रोजी दुपारी ठिक १२ – ०० वा. कर्जत गुलमोहर रेस्ट हाउस येथे व्हॉईस ऑफ मिडिया चे रायगड जिल्हा अध्यक्ष बेधडक महाराष्ट्र चे संपादक श्री. अभिजित दरेकर, व जिल्हा कार्याध्यक्ष संकेत घवारे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने कर्जत तालुका कमिटी स्थापन करण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पत्रकारांच्या हक्कासाठी व्हॉईस ऑफ मिडिया संघटना का असावी, संघटनेची ध्येय धोरणे, संघटना या तालुक्यात भविष्यात काय कार्य करणार या संबंधीत चर्चा करण्यात आली . यावेळी अनेक पत्रकारानी विविध विषय मांडले.संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व कोकण प्रदेश अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याचे व्हॉईस ऑफ मिडिया चे जिल्हाध्यक्ष अभिजित दरेकर यांनी यावेळी मत मांडले.
याप्रसंगी सर्वानुमते व जिल्हा कार्यकारिणीच्या अधिकाराने कर्जत तालुका व्हॉईस ऑफ मिडिया अध्यक्ष पदी बीजी 24 तास चे बाळू नामदेव गुरव , तर कर्जत तालुका कार्याध्यक्ष पदी कर्जत वार्ता चे संपादक प्रशांत नाना खराडे तसेच उपाध्यक्ष गणेश विजय लोट , महासचिव सुभाष पांडुरंग सोनावणे , खजिनदार कृष्णा रामदास सगणे , संघटक पंकेश जाधव , सदस्य विक्रांत विनोद मुंडेकर यांची निवड करण्यात आली . सदरची कमिटी हि दोन वर्षांसाठी कार्यरत असणार आहे.यावेळी व्हॉईस ऑफ मिडिया कर्जत ता. अध्यक्ष बाळू गुरव यांनी संघटनेने व सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे , तो मी सर्वांच्या मदतीने सार्थकी ठरवेन , व संघटनेचे कार्य वाढवून नागरिकांच्या तक्रारींचे समाधान कारक लेखणीने आवाज उठवून न्याय देईन , असे मत व्यक्त केले . याप्रसंगी नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या . वरील सर्व पत्रकारांबरोबरच तुषार बनसोडे हे देखील उपस्थित होते .