भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी उपस्थित राहून सातारा या ठिकाणी जाऊन परतताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या गाडीचा नुकताच अपघात झाला होता , मात्र लाखो आर पी आय कार्यकर्त्यांची पुण्याई त्यांच्या पाठीशी असल्याने ते त्यातून सुखरूप बचावले होते . कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड हे आठवले साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने हि खबर मिळताच लागलीच त्यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २३ मार्च रोजी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी यांनी मुंबई येथे जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून सदिच्छा भेट घेतली.
सदरचा अपघात हा २१ मार्च रोजी आठवले साहेब मुंबईला येताना वाई येथे त्यांच्या गाडीला आपघात झाला होता . पँथर च्या काळापासून ते आजपर्यंत त्यांचे जीवन संघर्षमय असून देशासहित राज्यात अनेक ठिकाणी गाव भेटी ते देत असतात . अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवताना दिसतात . म्हणूनच आज त्यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची फळी असून सर्वांच्याच पुण्याईने ते सुखरूप असल्याचे मत कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी व्यक्त केले . म्हणूनच त्यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपुस् करण्यात आली.
यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या समवेत कोकण प्रदेश सरचिटणीस जिवक गायकवाड , कर्जत तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे , कर्जत तालुका उपाध्यक्ष अंकुश सुरवसे , कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड , वेणगाव पंचायत समिती वार्ड अध्यक्ष नितीन सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते सतीश रिकिबे , आदी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.