![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
मावळच्या भावी खासदार सौ. माधवी ताई नरेश जोशी यांचा उल्लेखनीय कार्यक्रम..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी जवळीक असलेल्या , सातारा संस्थानच्या मातीच्या मुशीत वास्तव्य करून रायगडचे कर्जत तालुक्यात लग्न होवून नेरळ परिसरात रहाणारे उद्योजक नरेश सदानंद जोशी यांच्या पत्नी , आपण या समाजाचे काही देणे आहोत म्हणून सामाजिक बांधिलकीची व भावनेची जाणीव ठेवून गरजू, पीडित नागरिक , विद्यार्थ्यांना व क्रीडा खेळाडूंना मनापासून मदत तर त्यांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या , व सध्या मावळ मतदार संघात भावी खासदार म्हणून ” वादळासारखे घोंघावत ” असणाऱ्या सौ . माधवी ताई नरेश जोशी यांचे नेतृत्व आता सर्वसामान्य मतदारांना देखील पटू लागले आहे.
त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कार्यक्रमांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद , विद्यार्थ्यांना नुसतं हक्कासाठी लढा , तर पाण्यासाठी जीव गेलेल्या कुटुंबाला केलेली मदत , यांसारखे मदतीचा हात दिल्यानंतर त्यांनी आयोजित केलेल्या सौ . माधवी ताई नरेश जोशी प्रतिष्ठान च्या वतीने अभूतपूर्व गर्दीत झालेला हा विद्यार्थ्यांचा व आदर्श शिक्षक गुण गौरव सोहळ्यास ” न भूतो न भविष्यती ” अशीच यादगार पसंती मिळाली.
” सौ. माधवी ताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठाण ” च्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघाच्या भावी खासदार सौ. माधवीताई नरेश जोशी यांच्या शुभ हस्ते इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत उतिर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्या गुरूंनी त्यांना हे ज्ञान देवून सर्वश्रेष्ठ बनविले त्या शिक्षक रुपी गुरूंचा ” आदर्श शिक्षक ” विशेष गुणगौरव सोहळा – २०२३ कर्जत रॉयल गार्डन येथे शनिवार दि. २४ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस भावी खासदार डॉ. माधवी ताई जोशी , उद्योजक नरेश जोशी , त्यांचे आई बाबा यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर मावळ मतदार संघाच्या भावी खासदार सौ. माधवी ताई नरेश जोशी , उद्योजक नरेश जोशी , प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष रमाकांत जाधव , सचिव योगेश पोथरवर , सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर , झुलकरनैन डाभिया , संतोष दगडे , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी कर्जत तालुक्यातील ३५ शाळेतील जवळ जवळ आठशे च्या वर विद्यार्थ्यांना उतिर्ण झाल्याबद्दल व त्यांच्या बरोबर शिक्षकांचा सन्मानचिन्ह , सन्मान पत्र , रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला , तर तालुक्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा शाल , सन्मानचिन्ह , मूर्ती देवून सन्मानित करण्यात आले.
कर्जत तालुक्यात १० वी १२ वीत प्रथम क्रमांकाने उतिर्ण झालेल्या ३ विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह , पत्र , शाल व रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले , तसेच सार्वजनिक रक्तादाते राजाभाऊ कोठारी सर , गिर्यारोहक संतोष दगडे , वेटलिफ्टर अमृता भगत , आदिवासी भागात जाऊन मुलांना शिक्षणासाठी उत्तेजन देणाऱ्या भाविका जामघरे , तर पत्रकार बंधूंना सन्मानित करण्यात आले .यावेळी रॉयल गार्डनच्या सभागृहात विद्यार्थी , शिक्षक ,पालक , मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.