Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीवर आरपीआयचा निळा झेंडा फडकला !

कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीवर आरपीआयचा निळा झेंडा फडकला !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायत हद्द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा बालेकिल्ला आहे . येथील ग्रामपंचायतीवर आमदार महेंद्र शेठ थोरवे – शिवसेना व आर पी आय गटाचे वर्चस्व आहे . या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच येथे पार पडली असता , येथे सौ. सुस्मिता अमर जाधव यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे . त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आर पी आय ( आठवले गट ) पक्षाचा निळा झेंडा फडकला आहे.

या निवडीमुळे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांची काम करण्याच्या पद्धतीला व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .तिवरे गावचे आरपीआय कर्जत तालुका युवा अध्यक्ष अमर जाधव यांच्या सौभाग्यवती सौ. सुस्मिता अमर जाधव यांची तिवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने येथे आनंदाचे वातावरण असून , त्यांचे अभिनंदन करण्यास आर पी आय रायगड जिल्हा संपर्क प्रमूख धर्मानंद गायकवाड , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोदजी महाडीक , कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड , कर्जत तालुका महासचिव अनंता खंडागळे , महीला तालुका अध्यक्ष अलकाताई सोनावणे , ता म.उपाध्यक्ष अक्षता गायकवाड , कोंदिवडे ग्रामपंचायत सदस्य तथा तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड , उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड , सावेले जि .प. वार्ड अध्यक्ष अशोक गायकवाड , यांनी त्यांचे स्वागत करून पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या , तसेच सह सचिव जिवक गायकवाड , विकास गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड , नेरळ शहर अध्यक्षा सुरेखाताई कांबळे , सुनीता चव्हाण या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी आर पी आय पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी सौ. सुस्मिता अमर जाधव या उपसरपंच पदी विराजमान व सूत्रे हाती घेत असताना अनेक समाजसेवक , विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर , पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते . या पदाला साजेसा न्याय देवून ग्रामपंचायत हद्दीत विकासाची गंगा आणून नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी अग्रेसर असेन , असे मत नवनिर्वाचित उपसरपंच सौ. सुस्मिता अमर जाधव यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page