Thursday, June 19, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे "आई पोल्ट्री फार्म " चे उद्घाटन मोठ्या...

कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे “आई पोल्ट्री फार्म ” चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” आई ” या शब्दांत संपूर्ण विश्व सामावले आहे . निसर्गाने आपल्यात व आईच्या नात्यात एक अतूट नाल दिली आहे . ठेच लागली तरी ” आई ग ” असा आपसूक निघणारा स्वरच ” वेदना आणि मायेचं ” जिव्हाळा सांगून जातो . म्हणूनच म्हणतात ” स्वामी तिन्ही जगाचा – आई विना भिकारी ” , तरीही आईचे प्रेम व आठवण सतत आपल्या बरोबर असावी म्हणून अनेकजण तिच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्या घराचे , वास्तूचे , व्यवसायात ” आई ” चे नाव देवून तिचा आशीर्वाद पदरात पाडण्याचा प्रयत्न करत असतात.
असाच अल्पसा प्रयत्न कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील उत्तम जनार्दन जाधव – शिवसेना उपशाखा प्रमुख व त्यांचा मुलगा विवेक उत्तम जाधव यांनी व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून गरुड भरारी घेण्यासाठी आपली आई हिराबाई जनार्दन जाधव यांच्या नावाने ” आई पोल्ट्री फार्म ” असे नाव देवून पदार्पण केले आहे.

रविवार दि. १८ जून २०२३ रोजी ” आई पोल्ट्री फार्म ” चा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य भाई गायकर , कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर दादा थोरवे , शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संतोष शेठ भोईर , राजिपचे माजी समाजकल्याण सभापती सुभाष दादा गवळे , वेणगाव ग्रामपंचायतीचे माझी सरपंच तथा विद्यमान सदस्य अभिषेक गायकर , यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमास मोहन ढोले (बापू) – शिवसेना शाखाप्रमुख , माझी उपसरपंच उत्तम दादा सोनावणे , रिटायर्ड पोलीस अधिकारी भगवान पंडीत, सुशांत जोशी , उद्योजक प्रणित पांडुरंग घोडके , ग्रामपंचायत सदस्य दिनेश गायकवाड राजेश चव्हाण – संस्थापक अध्यक्ष कामगार सेवा संघटना महाराष्ट्र , ईश्वर भालेराव – महाराष्ट्र अध्यक्ष कामगार संघटना , शाखाप्रमुख मधुकर गायकवाड , ज्येष्ठ गायक विजय भाऊ ढोले , विवेक जाधव , मिलिंद ओव्हाळ – अपेक्षा एंटरप्रायजेस , उल्हास बोराडे , अमोल ढोले , विनोद भालेराव , त्याचप्रमाणे वेणगाव ग्रामस्थ , भीम गर्जना तरुण मंडळ पदाधिकारी , सदस्य , तसेच उत्तम जाधव यांचे मित्र परिवार , आप्तेष्ट , नातेवाईक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की , उत्तम जाधव यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर या व्यवसायात मजल मारली आहे , नोकरीत अनेक बंधने असतात , पण व्यवसायात तुम्ही नक्कीच भरारी घेवू शकता , पोल्ट्री हा चांगला व्यवसाय आहे , या व्यवसायात भरारी घ्या , अशा शुभेच्छा दिल्या , तर माजी उपसभापती मनोहर दादा थोरवे यांनी आपल्या ” आई ” चे पोल्ट्री फार्म ला नाव देवून खूप मोठं कार्य उत्तम दादा जाधव यांनी केले आहे , भविष्यात कुठली मदत लागल्यास सांगा , सर्व प्रकारची मदत केली जाईल , अशी प्रोत्साहन पर आश्वासन त्यांनी दिले.
तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संतोष शेठ भोईर यांनी देखील या छोट्या व्यवसायातून मोठे उद्योजक बना , अश्या शुभेच्छा दिल्या . यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत उत्तम जाधव व विवेक जाधव यांनी शाल – पुष्पगुच्छ देवून केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page