Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील वर्षावासचा सांगता समारंभ के.के.गाढे यांच्या नेतृत्वाखाली गौरकामथ येथे संपन्न !

कर्जत तालुक्यातील वर्षावासचा सांगता समारंभ के.के.गाढे यांच्या नेतृत्वाखाली गौरकामथ येथे संपन्न !

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )वर्षावास च्या निमित्ताने बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार होत असून बौद्ध धम्माचे आचार – विचार व आचरण आत्मसात करून बुद्धांच्या विचारांवर चालण्याचे स्फूर्तिदायक कार्य या कर्जत तालुक्यात होऊन त्याची सांगता गौरकामथ भूमीत झाली असल्याचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे ट्रस्टी व महासचिव व्ही. एस. मोखले, यांनी केले ते कर्जत तालुक्यातील गौरकामथ येथे बुद्धविहार उदघाटन , बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा व वर्षावास सांगता कार्यक्रमात बोलत होते यावेळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी येथील संजय नगर मध्ये बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
भारतीय बौद्ध महासभा कर्जत शाखेचे विद्यमान अध्यक्ष के.के.गाढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाची वाहवा तालुक्यात झाली.बुद्धीस्ट सोसायटी ॲाफ इंडीया (भारतीय बौध्द महासभा) तालुका शाखा कर्जत, जि. रायगड या धम्म संस्थेच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वर्षावास , आषाढ पौर्णिमा बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी ते आषाढ पौर्णिमा रविवार दि . ९ ॲाक्टोबर २०२२ या कालावधीत कर्जत तालुका अध्यक्ष के. के. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यत आली. या दरम्यान वर्षावास मालिकेची सांगता समारोप काल ९ ॲाक्टोबर रोजी कर्जत तालुक्यांतील गौरकामथ – वदप गावाचा मध्य असलेले संजय नगर येथे बुद्धविहाराचे उदघाटन करण्यात येवुन या बुद्धविहारात बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
येथील भारतीय बौद्ध महासभेचे विभाग क्रमांक ८ चे अध्यक्ष शरदजी रोकडे यांनी आकर्षक बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा केली. यावेळी या कार्यक्रमास राज्य, जिल्हा तसेच तालुक्यांतील अनेक धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली . तर या कार्यक्रमात पुज्यभन्ते महेंद्रबोधी यांनी आशिर्वाद दिले , या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव, केंद्रीय शिक्षक किसन रोकडे व बौध्दाचार्य शरद रोकडे, श्याम रोकडे यांनी केले.

या कार्यकर्मास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन संस्थेचे ट्रस्टी व महासचिव व्ही. एस. मोखले, महाराष्ट्र अध्यक्ष महेद्रजी मोरे, कोषाध्यक्ष सदाशिव कवडे, रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ कांबळे, रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया (आठवले) चे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, मारुती दादा गायकवाड , सुभाष गवळे , रिपाइंचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, साहीत्यिक लक्ष्मण तथा बंधू अभंगे, हरिश्चंद्र सोनावणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, उपाध्यक्ष नरेश गायकवाड, सचिव अनंता खंडागळे , कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, उपाध्यक्ष बबळु ढाले, दिपक गायकवाड, प्रकाश गायकवाड, भालचंद्र गायकवाड, नेरळ शहर अध्यक्ष दिनेश आढाव, जिवक गायकवाड, महीला संघटक सौ. वर्षा चिकणे, छगन रोकडे, संतोष जाधव , रजनीताई गायकवाड – माजी नगराध्यक्ष कर्जत , राजेंद्र क्षीरसागर – कोशाध्यक्ष रायगड , बी.एच.गायकवाड , रमेश कांबळे , तुकाराम गायकवाड , दिलीप जाधव , रमेश शिंदे , सुरेश सोनावळे – उद्योजक , बबन भालेराव , अशोक शिंदे , ए.डी. जाधव ,सुभाष जाधव , एल.एम.भालेराव , भीमराव रोकडे , शांताराम जाधव , श्याम रोकडे , मनोहर ढोले , बाळू देसाई , संतोष रोकडे , राजू ढोले , गणेश जाधव , सूर्यकांत गायकवाड , गौतम गायकवाड , दिपचंद गायकवाड , यासंह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेकजण उपस्थितीत होते.

दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी पार पडणेसाठी कर्जत भारतीय बौद्ध महासभेचा सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच वदप – गौरकामथ येथिल ग्रामस्थांनी मेहनत घेतली होती, तसेच या कार्यक्रमाच्या गौरकामथ संजय नगर येथे सर्व उपस्थितांना भोजन दान करणेत आले आहे, मोठ्या उत्साहात येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास सांगता कार्यक्रम तसेच बुद्धविहार उदघाटन व बुद्धमुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रम पार पडला.
यावेळी धर्मानंद गायकवाड यांनी धम्म कार्यास आरपीआय च्या वतीने नेहमीच मदत असते , या स्तुत्य उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी संस्थेचे कर्जत तालुका अध्यक्ष के.के. गाडे यांनी वर्षावास ३ महिन्याच्या कालावधीत बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात , वाडी वस्तीत फिरून धम्म प्रवचन मालिका तालुक्याच्या वतीने राबविण्यात आली आहे.या प्रवचन मालिकेस धम्म बांधव व भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .यावेळी अध्यक्ष के.के.गाढे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page