भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
रायगडचे भाग्यविधाते तथा खासदार आदरणीय सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन खांडस गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख महादेव गणपत ऐनकर यांचा माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश झाल्याने शिवसेनेच्या खांडस बालेकिल्ल्यात खिंडार पडल्याची चर्चा कर्जतमध्ये होत आहे.कर्जत तालुक्यातील खांडस प्रभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.
या भागात विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना कमी प्रमाणात मते मिळाली होती , म्हणूनच या भागात त्यांनी जास्त लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसण्यात येते . त्यातच आज खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांडस गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख महादेव गणपत ऐनकर यांचा पक्षप्रवेश करून शिवसेनेला तालुक्यात विचार करण्यास लावून बुरुज ढासळला आहे.
त्याप्रसंगी माजी आमदार सुरेशभाऊ लाड , कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक शरदभाऊ लाड , कळंब पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष शांताराम पाटील, खांडस ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मंगळशेट जयवंत ऐनकर, जनार्दन अनंता ऐनकर, (सामाजिक कार्यकर्ते), विलास अनंता माळी (माजी सरपंच), पंढरीनाथ ऐनकर (उद्योजक), अंकुश ऐनकर (सदस्य ) सदानंद ऐनकर,बाळा भोईर,अरूण ऐनकर, दिलीप गायकवाड हे कार्यकर्ते उपस्थित होते.महादेव ऐनकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याने पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल , असे चित्र दिसत आहे.