Wednesday, December 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषदेतर्फे दिव्यांग लाभार्थींना ५ टक्के निधीचे वाटप !

कर्जत नगर परिषदेतर्फे दिव्यांग लाभार्थींना ५ टक्के निधीचे वाटप !

नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा पुढाकार..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग कृती आराखडा अंतर्गत दिव्यांग लाभार्थी यांस मा. नगरविकास विभाग शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थीना ५ % निधी राखीव ठेवणे व निधी खर्च करणे बाबत शासन निर्णयान्वये सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार त्यांचे उदरनिर्वाह / व्यवसाय / साहित्य खरेदी करण्याकरीता कर्जत न.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर निधी प्रमाणे १६२ दिव्यांगांना दिव्यांग कृती आराखडा अंतर्गत प्रत्येकी ८,०००/- रू. निधी त्यांचे बँक खात्यात थेट जमा करणेत आले . यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थींना पालिके कडून दिलासा मिळाला आहे.

कर्जत न.प.हद्दीत एकूण १६२ दिव्यांग लाभार्थी आहेत . वर्षभरात विविध योजनेचा लाभ या लाभार्थींना मिळत असतो.यावेळी त्यांना ८ हजार रू. त्यांच्या थेट बँक ऑफ इंडिया या बँक खात्यात रक्कम जमा केली असून , यासर्व प्रक्रियेत मा. नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा पुढाकार महत्वाचा होता . एकूण १२ लाख ९६ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला.

यावेळी कर्जत न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते लाभार्थींना धनादेश पत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी , आरोग्य विभागाचे प्रमुख सुदाम अण्णा म्हसे , डी . के . गायकवाड , आदी कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page