Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून मनसेचे हेमंत सूर्याजी ठाणगे यांची एकमताने...

कर्जत नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून मनसेचे हेमंत सूर्याजी ठाणगे यांची एकमताने निवड..

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड व मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा एकमुखी निर्णय..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-कर्जत नगर परिषेदेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाआघाडीचे स्वीकृत नगरसेवक मनसेचे धनंजय दुर्गे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश भाऊ लाड व मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी घेतलेल्या निर्णयान्वये पुन्हा एकदा मनसेचे हेमंत सूर्याजी ठाणगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना जाहीर करण्यात आले.

राष्ट्रवादी भवन दहिवली येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनसेच्या बैठकीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून हेमंत ठाणगे यांचे नाव जाहीर केले . तत्पूर्वी गटनेते शरद भाऊ लाड यांनी कर्जत नगर परिषदेत जाऊन नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांची भेट घेऊन पक्षाने हेमंत ठाणगे यांच्या नावाची एकमुखी स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेली असल्याचे सांगितले . तसेच पदनिर्देशित अधिकारी तथा मा. उपविभागीय अधिकारी – कर्जत यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केला.माजी आमदार यांनी हेमंत ठाणगे यांचे नाव जाहीर करताच सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्या व्यक्त केल्या.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील , पालिकेचे गटनेते शरदभाऊ लाड , मनसे कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण ,माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड , माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्रदादा निगुडकर , माजी नगरसेवक धनंजय दुर्गे , वाहतूक सेना विधानसभा संघटक जयवंत कराळे , शहर सचिव चिन्मय बडेकर , शहर उपाध्यक्ष प्रज्योत घोसाळकर , रांकित शर्मा , राजेश साळुंखे , ता.उपाध्यक्ष विलास डुकरे , प्रविण बोराडे , अकबरभाई देशमुख , राजेश विरले , महिला शहर उपाध्यक्ष आकांक्षा सावंत – शर्मा , मराठा शिक्षण प्रसारक माजी अध्यक्ष सूर्याजी ठाणगे , एस.टी. कामगार मनसेना कार्याध्यक्ष रवि भोईर , राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोमनाथ पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्जत न. प. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – मनसे व इतर पक्ष अशी महाआघाडी निवडणुकीच्या वेळी झाली होती . त्यावेळी मनसे ला स्वीकृत नगरसेवक पद पाच वर्षांसाठी दिले जाईल , असा शब्द माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी दिला होता . म्हणूनच यापूर्वी मनसेचे धनंजय दुर्गे हे स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत होते.

मध्यंतरी कोरोना संसर्ग महामारीमुळे बैठक न झाल्याने दुर्गे यांना दोन वर्षांचा कालावधी मिळाला होता . आत्ता पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावरून राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या जागेवर मनसेचे डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळख असलेले व जनमानसात कार्यरत असलेले तसेच मनसेच्या प्रत्येक आंदोलने , मोर्चे , घडामोडीत अग्रेसर असलेले युवा नेतृत्व हेमंत सूर्याजी ठाणगे यांची मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सुचविलेल्या नावावर एकमुखी शिक्कामोर्तब झाले . राष्ट्रवादी भवन दहिवली येथे , नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत ठाणगे यांचे सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या .यावेळी दोन्ही पक्षाचे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते , व महिला आघाडी उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page