![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
अलिबाग येथे केलेल्या वक्तव्याचा ” आमदार महेंद्र थोरवे ” यांचा जाहीर निषेध तर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली त्यातून तरुणांनी स्फूर्ती घ्यावी , असे वक्तव्य अलिबाग येथे कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याने हे वक्तव्य निषेधार्थ असून , त्यांचे आम्ही जाहीर निषेध करून या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेविषयी देखील मागे असेच वक्तव्य या आमदारांनी केले होते , असे चुकीचे वक्तव्य व इतिहास सांगणाऱ्या आमदारांचा जाहीर निषेध करतो , व लवकरच या मतदार संघात ” गुन्हेगारीचा ” खरा ” आका ” कोण आहे ? याचा पर्दाफाश पुराव्यासहित करणार असल्याचा गौप्यस्फोट परिवर्तन आघाडीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी पत्रकार परिषदेत आज शुक्रवार दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी त्यांच्या कर्जत येथील संपर्क कार्यालयात केले . यावेळी सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत परिवर्तन विकास आघाडीचे नेते भरत भाई भगत , अशोक भोपतराव , अंकित साखरे , सुरेखा खेडकर , श्रीखंडे , पारटे , एकनाथ धुळे , संतोष बैलमारे , कुमार दिसले , पालकर , केतन बेलोसे , सुजित भोईर , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अलिबाग येथे येथील आमदारांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत औरंगजेबाची त्यांना उपमा देऊन चुकीचे वक्तव्य केले , याची दखल त्यांनी घेत ” कुठे गंगू तेली , व कुठे राजा भोज ” असा उपहासात्मक मत व्यक्त करत आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसलो तरी तटकरे साहेबच आमचे नेते आहेत , काल आज आणि उद्याही राहतील . तटकरे साहेबांनी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून इथे शिवसेनेला उमेदवारी मिळाल्याने मला थांबण्यास सांगितले , आम्ही राजीनामे देऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली , मात्र आमचा थोड्याफार मतांनी पराभव झाला . तटकरे साहेबांनी मला तिकीट दिली असती तर आज ” आमदार ” मी असतो , यावर प्रकाश टाकत तटकरे साहेब महायुतीशी प्रामाणिक राहून सुद्धा आज ते तटकरे यांच्यावर टिका करत आहेत ,यावर त्यांनी संताप व्यक्त केला.
या मतदार संघात बीड – बिहार पेक्षा भयानक परिस्थिती आहे . या मतदार संघात आमदार करत असलेले खंडणी , भ्रष्टाचार , दमदाटी , अधिकारी वर्गाला धमकावणे , या सर्वांचा मोजमाप आम्ही लवकरच सर्वांसमोर मांडणार आहे , गोदरेज , कल्पतरू हे गृह प्रकल्प मध्ये देखील स्थानिक ग्रामस्थांना रोजगार मिळत नाही , तेथील शेतकऱ्यांच्या जागा बळकावण्याचे काम , हुकुमशाही करून त्रास देण्याचे काम सुरू आहे , पोलीस देखील दडपणाखाली आहेत , पोलिसांना इतरांकडून पैसे घेण्याचे काम लावले जात आहे , येथील अधिकाऱ्यांची बदली कश्या झाल्या , याची माहिती देखील देण्यात येईल .या सर्व गुन्ह्यांच्या पाठीमागचा ” आका ” कोण आहे , याचा खुलासा लवकर होणार , असा गौप्यस्फोट त्यांनी केला . तर आमदार महेंद्र थोरवे यांचे निलंबन व्हावे , अशी जोरदार मागणी सुधाकर भाऊ घारे यांनी केली.
मुंबई – कर्जत – पनवेल या सबर्मल कॉरिडॉर नवीन रेल्वे लाइन मार्गावर होत असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाला ” हुतात्मा वीर हिराजी पाटील ” स्थानक असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली असून याची दखल घेतली असून केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू आहेत , जर हे नाव देण्यास दुर्लक्ष केले तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला . यावेळी भरत भाई भगत , अशोक भोपतराव , एकनाथ धुळे , संतोष बैलमारे , अंकित साखरे यांनी देखील तीव्र शब्दात येथील आमदार महेंद्र थोरवे यांचा अलिबाग येथे सुनील तटकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला .अशोक भोपतराव यांनी औरंगजेब म्हणून तटकरे यांना उपाधी देणाऱ्या येथील आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो , असे म्हणत तटकरे साहेबांनी येथे युतीचा धर्म पाळला , आम्ही जरी पक्षात नसलो तरी आमच्या नेत्यांना बोलण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही सहन करणार नाही , आम्ही सडेतोड उत्तर परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून देणार , असा इशारा दिला . सुनील तटकरे येथील रायगडच्या राजकारणात अंतुले साहेबांच्या नंतर विकास घडविणारे ” विकास पुरुष ” आहेत , त्यांच्या विरोधात येथील आमदार उभे रहाण्याच्या गप्पा मारतात , यावर त्यांनी खडे बोल सुनावले .