if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )विजय हा ” १ ” मताने होवो अथवा ” लाख ” मताने होवो , ” विजय ” अखेर विजयच असतो . पण स्पर्धा परीक्षेत आपण केलेल्या अभ्यासावरुन जर आपल्याला ” जेमतेमच ” मार्क पडले , तर मात्र आपण केलेला अभ्यास कमी पडला असेच आहे , हे जेमतेम मार्क , नक्कीच ” खेदजनक ” असून ” त्या वेळेचा – त्या शिक्षकांचा – व केलेल्या मेहनतीचा ” तो अवमांनच आहे . असेच काहीसे चित्र कर्जत खालापूर मतदार संघात दिसून येत आहे . थोडे थोडके नव्हे तर तब्बल ” २९०० कोटी ” रुपयांचा विकास निधी आणून केलेल्या विकास कामातून मिळालेला हा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा फक्त ५६९४ मतांचा विजयी अक्षरशः खेदजनक असून त्या – त्या प्रभागातील ” लेबल धारी पदाधिकाऱ्यांनी ” किती आणि काय कामे केली ? याची शिवसेनेला ” उजळणी ” घेण्याची व ” आत्मचिंतन ” करण्याची गरज असल्याचे या ” विजयातून ” दिसून येत आहे .
कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी अडीच वर्षे कोरोना काळात व नंतरच्या अडीच वर्षांत २९०० करोड रुपयांचा निधी आणून या मतदार संघाचा कायापालट केला . अनेक विकास कार्य केले . पायाला ” भिंगरी ” लावून ते सातत्याने मतदार संघात फिरत होते . अनेक कार्यक्रम घेवून त्यांनी कला – क्रीडा – शिक्षण – रोजगार – महिला सक्षमीकरण – सण – उत्सव – सामाजिक – धार्मिक – सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अहोरात्र कष्ट करून शिवसेनेची विस्कटलेली घडी बांधून विजया साठी पूरक वातावरण तयार केले . आपल्या मतदार संघात असलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती प्रभाग नुसार पदाधिकारी घडविले , सफेद फोश कपडे घालून , भाषणबाजी करून त्या पदाधिकाऱ्यांनी सरत्या शेवटी राजकीय परीक्षेत उल्लेखनीय ” मतांची ” गोळा बेरीज दिली का ? याचे चिंतन – मनन करण्याची हिच ती वेळ आहे . गेल्या २०१४ साली फक्त १८०० मतांनी निवडून आलेले माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी आपल्या एव्हढुशा मतांच्या विजयाचे चिंतन – मनन केले नाही म्हणूनच की काय त्यांना २०१९ साली प्रचंड मतांनी ” पराभवाला ” सामोरे जावे लागले , हे विसरता येणारे नसून आणि म्हणूनच विजयी झालेले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना या विजयाची आत्मचिंतन करण्याची आता वेळ आली आहे .
कर्जत तालुक्यात शिवसेनेची प्रचंड मोठी ” ताकद ” असताना येथील सर्व जिल्हा परिषद विभागात अपक्ष उमेदवार ” सुधाकर भाऊ घारे ” यांनी दिलेली चुरशीची ” लढत ” हि देखील ” वाखानण्याजोगे ” असून जर येथून त्यांनी जादा मतांची आघाडी घेतली असती तर मात्र खालापूर तालुक्यात हि आघाडी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना तोडता आली नसती तर त्यांचा ” पराभव ” अटळ होता , आणि तो विकास कार्याचा ” अवमान ” झाला असता , म्हणूनच इतक्या कोटी रुपयांचा विकास कार्य करूनही शिवसेनेचे मात्तब्बर पदाधिकारी यांनी आपल्या प्रभागात काय काम केले ? कोण कुठे कमी पडले ? याची ” उजळणी व आत्मचिंतन ” करण्याची गरज आमदार महेंद्र शेठ थोरवे व शिवसेनेला येवून ठेपली आहे . तरच पुढील काळ शिवसेनेला व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना ” सुखकर ” जाऊन विजयाची हि मालिका अखंडित राहू शकते , अन्यथा भविष्यात विरोधक टपूनच बसले असून ” रात्र वैऱ्याची ” ठरायला वेळ लागणार नाही .