Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत मधील समस्यांबाबत सर्वच " राजकीय पक्ष " कोमात !

कर्जत मधील समस्यांबाबत सर्वच ” राजकीय पक्ष ” कोमात !

” आणि म्हणे मी नगराध्यक्ष होणार – नगरसेवक होणार “,,,,,,,आंदोलने नसल्याने सर्व पक्षांची धार झाली बोथट..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषदेची लोक प्रतिनिधींची सत्ता संपुष्टात येऊन आज ” १५ महिने ” झाले . आता सध्या कर्जत नगर परिषदेवर ” तत्कालीन मुख्याधिकारी वैभव गारवे व आता तानाजी चव्हाण ” यांची प्रशासकीय राजवट आहे . गेल्या १५ महिन्यात कर्जतकर नागरिकांना अनेक समस्यांनी वेढले असून ” हातभर समस्यांना बोट भर उपाय ” असताना नियोजना अभावी या समस्या ” जैसे थे ” , दिसत आहेत . मात्र याविरोधात एक हि ” राजकीय पक्षाने ” संतप्त भूमिका घेतली नसून उपोषणे , रस्ता आंदोलने , मोर्चे , संतप्त धरणे आंदोलने नसल्याने सर्व पक्षाची राजकीय धार बोथट झाली असून सर्वत्र शांतता पसरली असून सर्व पक्ष व त्यांचे पदाधिकारी ” कोमात ” गेले का काय ? असा सर्व सामान्य नागरिक व उद्याचा ” कर्जतकर मतदार ” संतप्त होऊन विचार करत आहे .

सध्या कर्जतमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणारी ” पेज नदी ” तुडूंब वहात असताना सर्व प्रभागात पाणी टंचाईला कर्जतकर नागरिकांना सामोरे जावे लागत आहे . कर्जत मधील सर्व प्रभागात हि समस्या असल्याने सोसायटी धारक , प्रभाग परिसर , गाव परिसरातील तुरळक महिला भगिनी , नागरिक येऊन पालिका प्रशासनावर आपला संताप व्यक्त करत आहेत , हा संताप ” कमी ” पडत असल्याने पाण्याची समस्या अद्यापी सुरळीत झाली नाही.

कचरा समस्या , वाहतूक समस्या , वर्क ऑर्डर निघूनही अद्यापी प्रभागातील कामे न होणे , अर्धवट झालेली कामे , पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडूजी , गटारावरील तुटलेली झाकणे , रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग , अश्या विविध समस्या असताना एक ही राजकीय पक्ष या समस्येतून कर्जतकर नागरिकांची ” सुटका ” करताना दिसत नाहीत.

” आणि म्हणे मी – नगरसेवक होणार – नगराध्यक्ष होणार ” अश्या बड्या बड्या बाता करताना येथील पक्ष पदाधिकारी दिसत असून आपल्या प्रभागातील पक्षाच्या माध्यमातून समस्या सुटत नसताना हे निवडून तरी येतील का ? असाही यक्ष प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे . कर्जत न. प. वर यापूर्वी शिवसेना – भाजप – आर पी आय पक्ष अशी सत्ता होती . तर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , मनसे , एस आर पी . बी एस पी , वंचित , शेकाप , काँग्रेस पक्ष असे बलाढ्य पक्ष असताना सत्ताधारी व विरोधी असे सर्वच पक्ष ” कोमात ” गेल्यासारखे चित्र असून कर्जत नगर परिषद ” बुजगावणे ” प्रशासनावर व प्रशासक मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यावर आंदोलने विरहित कुणाचाही ” अंकुश ” राहिला नसल्याने त्यानिमित्ताने राजकीय पक्षांची धार ” बोथट ” झाल्याचे चित्र सध्या कर्जतमध्ये दिसत आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page