स्थानिकांना नेरळ – कर्जत ला जाण्या साठी द्यावे मोजावे लागत आहे जादा पैसे…..
दत्ता शिंदे …माथेरान
गणपती मुहूर्तावर कर्जत -माथेरान मिनी बस चालू होईल ह्या भरोश्यावर माथेरानकर होते परंतु कर्जत आगाराने माथेरानकारांची घोर निराशा केली आहे आहे.राज्यात सर्वत्र एस.टी.महामंडळाच्या लाल परी धावत आहे.मग माथेरान ची एस.महामंडळाची मिनी बस का चालू होतं नाही असा सवाल स्थानिकां उमटत आहे.
माथेरान ला येण्या जाण्या करीता महत्वाची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या नेरळ माथेरान कोरोनाच्या संकट काळी बंद करण्यात आली त्याच प्रमाणे माथेरान ची मिनी ट्रेन ही सुद्धा अध्याप बंद आहे.त्या मुळे ज्यांची स्वतःची वाहने आहेत ते वेळ प्रसंगी नेरळ माथेरान ये – जा करीत असतात.परंतु आधीच मार्च पासून माथेरानचे पर्यटन व्यवसाय बंद आहे.
त्या मुळे येथील स्थानिकांना काही कामा निमित्त माथेरान सोडून बाहेर गावी जायचे असेल तर जास्त पैसे देऊन खाली उतरावे लागत आहे.आधीच सहा महिन्या पासून येथील स्थानिकांचा व्यवसाय बंद आहे.
त्या मुले पैशा अभावी स्थानिकांना सरकारी बस सेवा मिळाली तर खूपच बरं होईल.व स्थानिकांना स्वस्तात प्रवास होईल .त्या मुळे एस.टी.महामंडळाने लवकरात लवकर कर्जत माथेरान मिनीबस चालू करावी अशी स्थानिकांची मागणी आहे.