Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत मेडिकल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत मेडिकल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत – कर्जत मेडिकल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशनतर्फे तालुक्यातील 454 वे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि. 10 जुलै रोजी सकाळी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे करण्यात आले होते.

या शिबिरात सहभाग नोंदवून एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक , राष्ट्रीय व मानवतावादी कार्य करून सहकार्य केले.

यावेळी कर्जत मेडिकल असोसिएशन चे सचिव माननीय डॉ.आदित्य जंगम यांनी प्रास्ताविक केले तर कर्जत मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ . नितीन भोपतराव यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व रक्तदान शिबिराला सुरवात झाली . या रक्तदान शिबिरात डॉ . शर्वाणी कुळकर्णी यांनी प्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिरा ची सुरवात केली . या प्रसंगी अनेक डॉक्टरांनी रक्तदान केले तसेच प्रा . डॉ नितीन आरेकरांनी सुद्धा रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबीरास डॉ.नितीन भोपतराव , डॉ . आदित्य जंगम , डॉ . संगीता दळवी , डॉ . आशिष कर्वे, डॉ . कर्वे , डॉ . भाग्यश्री कुलगुडे , डॉ. शर्वाणी कुळकर्णी , डॉ . आशुतोष कुळकर्णी , डॉ . प्रतिक कांबळे , डॉ . श्रीपाल जैन , डॉ . निलेश म्हात्रे , डॉ . भारती जैन , डॉ . नागेश चितळे , डॉ . आदित्य काळे , डॉ . प्रभाकर काळे , डॉ . कुमार ओसवाल , डॉ . रितेश जैन , डॉ प्रथमेश अळसुंदेकर , ज्येष्ठ पत्रकार रायगड भूषण विजयराव मांडे , प्रा . डॉ . नितीनजी आरेकर , विकासजी चित्ते , जयवंत म्हसे , सतीशशेठ पिंपरे , अमोल साळवी , चैतन्य करंजकर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय कर्जतचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बनसोडे व त्यांचे इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले . या प्रसंगी रक्तसंकलानाचे काम कल्याण येथील संकल्प रक्तपेढीचे डॉ . देसाई , राजशेखर नायर व इतर कर्मचाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page