Sunday, June 22, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्थानकावर प्रवासी वर्गात महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती...

कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्थानकावर प्रवासी वर्गात महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात जग झपाट्याने वाटचाल करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना बँक कर्ज देण्याचे आमिष दाखवून नंतर सेक्स्युयल बदनामी करून मानसिक त्रास देवून पैसे लुबाडणाऱ्या टोळ्या , तर रात्रीच्या वेळी प्रवास करताना घेण्याची सुरक्षितता याबाबतीत , घेण्यात येणारी खबरदारीची माहिती आज कर्जत रेल्वे स्थानकावर पोलीस उपनिरीक्षक तानाजी सरकाले व महिला पोलीस , होमगार्ड यांच्या साहाय्याने महिला रेल्वे प्रवासी वर्गाला देवून जनजागृती केली.

रात्रीच्या वेळी महिला मोठ्या प्रमाणात प्रवास करतात , म्हणूनच ज्या डब्यात महिलांनी पोलीस , होमगार्ड असतील त्याच डब्यात बसून प्रवास करावा , आपल्या छोट्या मुलांची , सामानाची काळजी घ्यावी , रात्रीच्या प्रवासात सोन्याचे दागिने घालू नये , तर त्वरित कर्ज देण्याच्या ज्या लिंक मोबाईल वर येतात त्या स्वीकारू नये , जेणेंकरुन महिला आपल्या वैयक्तिक माहिती , फोटो देवून नंतर ही टोळी त्यांना सेक्स्युयल बदनामी करून , मानसिक त्रास देवून पैसे लुबाडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने व सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने , याबाबतची सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याची जनजागृती आज कर्जत रेल्वे पोलीस ठाणे ( GRP ) च्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली . यावेळीं रेल्वे प्रवासी , व महिला वर्गाने ऐकून घेवून चांगला प्रतिसाद दिला.
- Advertisment -

You cannot copy content of this page