![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्टेशन झाल्यापासून अद्यापपर्यंत रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने पूर्व ( ईस्ट ) व पश्चिम ( वेस्ट ) या दिशा दाखविणारे फलक लावले नाहीत , त्यामुळे कर्जत शहरामध्ये येणाऱ्या पनवेल , मुंबई , पुणे , नवी मुंबई , प्रवासा दरम्यान येणाऱ्या प्रवाश्यांना येथे आल्यावर कर्जत शहरात जाण्यासाठी तसेच त्यांच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रेल्वे स्थानकावर दिशा दाखविणारे फलक लावले नसल्याने कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर आल्यावर बरेचसे नवीन प्रवासी असल्याने पूर्व विभाग कोणता , पश्चिम विभाग कोणता ? हे समजत नाही , तर त्यांना कोणीही योग्य दिशा सांगत नाही , त्यामुळे प्रवाशांची गैरसोय व नाहक त्रास होतो . याबाबतीत अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत उपशहर प्रमुख राजेश साळुंखे यांच्याकडे आल्याने लागलीच त्यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासनाशी संपर्क केला असता , त्यांनी केलेल्या प्रश्नांमुळे ” कर्जत रेल्वे स्थानक दिशाहीन ” असल्याचे उघडकीस आले आहे.
आजपर्यंत कर्जत रेल्वे प्रशासनाने दिशा दर्शक फलक न लावल्याने कर्जत शहर मनसे ने तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित प्रवाशांच्या सोयीसाठी दिशा दाखविणारे फलक लावावे , असे निवेदन कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक लाल यांना देण्यात आले.
कर्जत रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे मुंबई – पुणे मार्गाचे मध्यवर्ती ठिकाण आहे . कर्जत स्थानकापासून मुंबई पर्यंत रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर पूर्व – पश्चिम असे दिशा दाखविणारे फलक लावलेले असतात , मात्र असे फलक कर्जत रेल्वे स्थानकावर का नाहीत ? या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रश्नाने रेल्वे प्रशासन विचारात पडली आहे . रेल्वेच्या नियमानुसार १ नंबर प्लॅटफॉर्म च्या बाहेरची दिशा हि पश्चिम म्हणजे वेस्ट असते तर त्याच्या विरुद्ध दिशेला पूर्व म्हणजे ईस्ट असते . मात्र कर्जत मधील भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास सूर्य उगवणारी दिशा पूर्व असल्याने हि दिशा कर्जत रेल्वे स्थानक १ नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेला येत असल्याने हि दिशा रेल्वे नियमाच्या विरुद्ध येत आहे , म्हणून या दिशेला पश्चिम ( वेस्ट ) असे दिशा दर्शक म्हणू शकत नसल्याने रेल्वे प्रशासन विचारात पडली आहे.
याबाबतीत वरिष्ठ कार्यालयाला आपले निवेदन देवून तसेच कर्जत नगर परिषदेच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करून प्रवासी वर्गाची व बाहेरून आलेल्या नागरिकांची गैरसोय व त्रास होणार नाही , असा मार्ग काढला जाईल , असे कर्जत रेल्वे प्रबंधक लाल यांनी सांगितले आहे . सदरच्या या महत्त्वपूर्ण समस्येचे निवेदन व चर्चा करण्यास मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म.न.रे.का.से. सन्माननीय श्री. जितेंद्रदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहर उपाध्यक्ष राजेश साळुंखे , कर्जत शहर उपाध्यक्ष रांकित शर्मा , कर्जत शहर अध्यक्ष – म.न.वि.से. कु.मयुरेश जोशी , महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना मुंबई विभाग सह. सचिव मंगेश मोहन दळवी , कर्जत युनिट सचिव विश्वनाथ लदगे व कर्जत युनिट पदाधिकारी तसेच मनसे सैनिक उपस्थित होते.