Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत वीज कंपनीच्या विरोधात नागरिकांचा एल्गार !

कर्जत वीज कंपनीच्या विरोधात नागरिकांचा एल्गार !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नागरिकांना वीज सेवा देणारी कर्जत वीज महावितरण कंपनी कार्यालयाने गेली २ वर्षे उपकार्यकारी अभियंता ” प्रकाश देवके ” या निष्ठुर अधिकाऱ्याने कर्जत तालुक्याच्या नागरिकांना ” हकनाक ” त्रास दिला आहे . त्यांच्या कार्यकिर्दित सतत वीज पुरवठा खंडित होणे , ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणे , छोट्याशा कामाला दिवसभर वीज नसणे , भरमसाठ वीज बिले , कामगार वर्गावर अंकुश नसणे , कुठलाच अधिकारी व वायरमन फोन न उचलणे , नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न होणे , अश्या विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असलेली कर्जत तालुक्याची जनता अक्षरशः वैतागली होती.
वीज आजच्या या युगात किती महत्त्वाची आहे , याचा विचार न करता या विजेवर चालणारी शासकीय कामे व आर्थिक उलाढालीवर याचा परिणाम होत होता . याविरोधात कर्जत तालुका संघर्ष समिती स्थापन करून गेल्या महिन्यात भव्य मुक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता . तरीही आपल्या कामात सुधारणा न झाल्याने अखेर आज सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक चौकात कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी स्थापन केलेल्या कर्जत तालुका संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करून वीज कंपनी कार्यालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात ” एल्गार ” पुकारला आहे.

कर्जत तालुका संघर्ष समितीचे निमंत्रक ऍड. कैलास मोरे व सर्व सभासदांनी केलेल्या मागण्या देखील कर्जत वीज कंपनी कार्यालय अधिकारी , पनवेल कार्यकारी अभियंता यांनी मान्य केल्या नाहीत , तर मागितलेली माहिती , आमची चुकी काहीच नाही , आम्ही चुकलेलो नाही , या अविर्भावात दिल्याने भविष्यात कधीच कर्जतकर नागरिकांच्या मागण्या मान्य होणार नाही , असे दाखविण्याचा संतापजनक प्रयत्न केलेला आहे.

कर्जत वीज महावितरण कंपनीच्या अश्या भोंगळ कारभाराला लगाम लावण्यासाठी केलेला ” संतप्त एल्गार ” प्रकाशगड मुंबई कार्यालयापर्यंत पोहचला असल्याने कर्जत वीज कंपनीचा निष्ठुर उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके याची येथून हकालपट्टी केली असून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई होणे गरजेचे आहे.

आजच्या या साखळी उपोषणास सर्व पक्षीय पाठींबा असून कर्जत प्रेस क्लब , नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था , शिवसेना ( उ बा ठा ) उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी पत्र देवून जाहीर पाठिंबा दिला आहे . तर आजच्या या साखळी उपोषणास ऍड. कैलास मोरे , ऍड. संदिप घरत , राजेश मिरकुटे , ऍड. चंद्रा चव्हाण , अस्मिता सावंत , हरेश सोनावळे , मल्हारी माने , ऋषिकेश भगत , राकेश इंगळे , मुकेश पाटील , हेमंत बडेकर , कृष्णा पवार , दिलीप शिंदे , संतोष मूने , मनोज रामदाम पाटील , तुषार वाडेकर , ऋषिकेश भगत , अजय ठमके , अमोघ कुळकर्णी , आदी कर्जत तालुक्यातील उपोषणकर्ते बसले आहेत.

तर अनेक राजकीय पक्षातील मा. आमदार सुरेश भाऊ लाड , ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , भाजप अध्यक्ष राजेश भगत , पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम , वकील संघटनेचे पदाधिकारी डिमेलो , गायकवाड , ऋषिकेश जोशी , वंचित बहुजन आघाडीचे दिपक दादा मोरे , जिल्हा नेते हरिश्चंद्र दादा यादव , ता . अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे , लोकेश यादव , शिवसेनेचे पप्पू शेळके , शिंदे , बसपा चे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्जतकर नागरिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page