Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड"कर्जत शहरातील पाण्याची समस्या सोडवून विकासात्मक कार्यात दूरदृष्टी ठेवणारा कार्यसम्राट आमदार "

“कर्जत शहरातील पाण्याची समस्या सोडवून विकासात्मक कार्यात दूरदृष्टी ठेवणारा कार्यसम्राट आमदार “

वाढीव पाणी योजनेसाठी ५७ करोड निधी मंजूर , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर कौतुकाची थाप !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या विकास कार्यातून नेहमीच ” दूरदृष्टी ” ठेवून आपल्या ” संकल्पनेची छाप ” ठेवणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होत असताना आज दसऱ्याच्या मुहूर्तावर कर्जतकरांना व महिला भगिनींना वाढीव पाणी योजनेच्या माध्यमातून कायमची पाणी टंचाई दूर करून ” मोकळा श्वास ” घेण्याचे ” स्वप्न ” आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी साकार केले . तब्बल ५७ करोड रुपयांचा निधी मंजूर करून आणून या ” अमृत तूल्य योजनेचा ” भूमिपूजन सोहळा आज दसरा विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी कर्जत नगर परिषदेच्या प्रांगणात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत मुख्याधिकारी वैभव गारवे , मा. नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , ता. प्रमुख संभाजी जगताप , संघटक शिवराम बदे , मा. उपनगराध्यक्ष तथा आर पी आय कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , संघटक पंकज पाटील , जिल्हा उपसंघटक अरुण देशमुख , किसान मोर्चाचे सुनील गोगटे , मा. नगरसेविका स्वामींनी मांजरे , शहर संघटिका सायली शहासने , संघटिका ज्योती जाधव – कुलकर्णी , दक्षिण शहर प्रमुख संजय मोहिते , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , मा. नगरसेवक मोकल आण्णा , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक दिनेश कडू , संघटक नदीम भाई खान , संपर्क प्रमुख सुदेश देवघरे , उपशहर प्रमुख मोहन भोईर , संपर्क प्रमुख नारायण जूनघरे , विभाग प्रमुख राकेश शेट्टी , विकास दादा चित्ते , अनंता जूनघरे , राकेश दळवी , त्याचप्रमाणे पालिका अधिकारी , कर्मचारी , व कर्जतकर नागरिक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या दसरा मुहूर्त वाढीव पाणी योजनेचा भूमिपूजन करत मार्गदर्शन करताना म्हणाले की , शहरात पाण्याची दयनीय अवस्था होती , वाढते शहरीकरण होत असल्याने पाणी पुरत नव्हते , पूर्वीची पाणी योजना ३० वर्षापूर्वीची असल्याने आम्ही आमदार झाल्यावर केंद्रात – राज्यात – व शहरातही आपली सत्ता असताना अशक्य काहीच नव्हतं . ” पंतप्रधान अमृत तुल्य योजना ” कर्जतकर नागरिकांसाठी राबवून विशेष प्रयत्न करून त्यासाठी तब्बल ५७ करोड रुपये मंजुर केले , यावर प्रकाश टाकला . तर वाढीव पाणी योजनेत सर्व बाबतीत क्षमता आपण वाढवणार आहोत , त्यासाठी साडे तीन करोडचे ” एक्सप्रेस फिडर ” बसवून आपण विजेची समस्या कायमची दूर करणार आहोत . म्हणजे ” विज नाही म्हणून पाणी नाही ” हे वाक्य खोडून टाकल्याचे त्यांनी सांगितले . शासन योजना राबविण्यास ” कटिबध्द ” आहे , पण आपण ही ” दूरदृष्टी ” ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण मत त्यांनी व्यक्त केले . शहरात इमारतीचे मजले वाढत आहेत , म्हणून भविष्याचा विचार करून पुढील ३० वर्षानंतरची दूरदृष्टी या वाढीव पाणी योजनेत दिसणार आहे . या मतदार संघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तब्बल २९०० कोटी आपण या पाच वर्षात आणले आहेत , असे सांगून तालुक्यातील जनतेसाठी देखील १४०० कोटी निधी ” कोंढाणा धरणासाठी ” मंजुरी मिळवली आहे . शिवसेनेच्या माध्यमातून माझे स्वप्न होते की या मतदार संघाचे ” नंदनवन ” करायचे म्हणूनच सर्व रस्ते काँक्रीटीकरण केले , त्यामुळे भविष्यात येथे ” डेव्हलपमेंट ” होणार आहे . रोजगार संधी मिळावी यासाठी पर्यटनाला प्राधान्य देत येथील वैभव वाढवण्यासाठी येणारे पर्यटक ” अतिथी देवो भव ” ही संकल्पना जोपासली . सर्व जग पर्यटनावर भर देवून ” आर्थिक उलाढाल ” करत असताना आपण ही हा बदल घडवला , यावर त्यांनी प्रकाश टाकला . येथील सर्व जनता सुज्ञ आहेत विकासाला प्राधान्य देणारी आहे , पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात पाण्याला महत्त्व दिले आहे , ” हर घर – घर जल ” हे त्यांचे स्वप्न आम्ही येथे साकारले असल्याचे त्यांनी सांगितले . कर्जतमध्ये ” ऐतिहासिक वास्तू ” केल्या आहेत , रेल्वे ब्रीज ते दहिवली परिसरात ऐतिहासिक वास्तू उभारून ” नंदनवन ” केल्याचे स्वप्न साकारले आहे . upsc विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आपण ” संग्रहालय ” उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी देशाच्या जडण घडणीत आपले योगदान देणारे ” स्वर्गीय रतनजी टाटा ” यांना सर्वांनी श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी मा. नगरसेवक राहुल डाळींबकर , पत्रकार विजय मांडे , गडकरी , मा. नगरसेविका स्वामींनी मांजरे , वसंत शेठ भोईर , दिपक बेहेरे , मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी देखील मत व्यक्त केले . दहिवली विचार मंच च्या वतीने यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्वांना ” दसरा विजया दशमीच्या ” शुभेच्छा व्यक्त केल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page