टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हॉईस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर , यांची प्रमुख उपस्थिती..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) चार चाकी वाहनांत गेली ” अनेक दशके ” वाहन चाहत्यांना मजबुती आणि सुरक्षिततेसाठी विश्वसनीय सेवा देणारी ” टाटा हेरिटेज मोटर्स ” या कंपनीची चार चाकी वाहने सगळीकडे ” अव्वल ” ठरून सर्वांच्या पसंतीत उतरत आहेत . राज्यात प्रमुख शहरात नागरिकांत अव्वल ठरल्याने आता कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हालिवली ग्रामपंचायत हद्दीतील भिसेगाव खिंड , ग्रीन व्हिव हॉटेलच्या समोर टाटा कंपनीचे ” टाटा हेरिटेज ” शोरुम भव्य व दिमाखात थाटण्यात आले असून दर्जेदार दिसण्यास व दिमाखदार असलेली टाटा हेरिटेज कंपनीची CURVV चार चाकी गाडी सर्व चाहत्यांनी खरेदी करून आपला आनंद व उत्साह द्विगुणित करावा , असे बहुमोल मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष तथा किरवली ग्रामपंचायतीचे मा. सदस्य हिरामण भाई गायकवाड यांनी त्यांच्या शुभहस्ते झालेल्या ” CURVV ” गाडी लाँच करताना उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
काल शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीची ” CURVV ” या रुबाबदार दिसणाऱ्या काळया रंगाची ५ सिटर गाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ( आठवले ) पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या शुभहस्ते लाँच करण्यात आली . या नव्या CURVV चार चाकी गाडीच्या लाँच कार्यक्रमात गाडीच्या नावाचा ” केक ” कापून नंतर अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या हस्ते ” फित ” कापण्यात आली . याप्रसंगी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे व्हॉईस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर , सुनील भोसले – कर्जत शो रुम मॅनेजर , आर पी आय कर्जत ता. संपर्क प्रमुख तथा कोंदिवडे ग्रामपंचायत सदस्य किशोर गायकवाड , वेणगाव पंचायत समिती विभाग अध्यक्ष नितीन सोनावणे , सतिश रिकीबे , विजय गायकवाड , श्रीकांत गायकवाड , कैलास कुडेकर , त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते व इतर शो रुम कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे ” व्हॉईस प्रेसिडेंट राहुलजी सूर्यवंशी सर ” यांनी ” टाटा कर्व्व ” च्या भव्य लाँचमध्ये सर्वांचे स्वागत करत आजपर्यंत टाटा कंपनीने Nexon.ev , safari , punch , Nexon , Tiago , Alroz , अशा दर्जेदार चार चाकी वाहने मार्केटमध्ये आणली असून आता ” CURVV ” हि दर्जेदार व विश्वसनीय सुरक्षित असलेली गाडी चाहत्यांसाठी मार्केटमध्ये आणली आहे . या गाडीची माहिती देताना त्यांनी सांगितले की , १२.३-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १०.२५-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि पॅनोरॅमिक सनरूफ यासारख्या विविध वैशिष्ट्यांसह ही कार ” पेट्रोल आणि डिझेल ” इंजिन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ६ आणि ७ – स्पीड ट्रान्समिशन पर्याय आहेत. Curvv मध्ये ५०० लिटरची बूट स्पेस आहे , तसेच वायरलेस चार्जिंग, ६ एअरबॅग्ज आणि JBL साउंड सिस्टम सारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. टाटा कर्वची प्रमुख वैशिष्ट्ये – एनफोटेनमेंट – वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह , सनरूफ – व्हॉइस-असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ , इंटीरियर लेदरेट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट , इंजिन पर्याय – १.२-लिटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लिटर डिझेल इंजिन , ट्रान्समिशन – ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड डीसीए (ड्युअल क्लच ऑटोमॅटिक) , सुरक्षा – ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्ये , आराम – पूर्णपणे स्वयंचलित तापमान नियंत्रण, क्रूझ नियंत्रण आणि हवेशीर पुढच्या जागा , तंत्रज्ञान – वायरलेस फोन चार्जिंग, ९- स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि एअर प्युरिफायर , जागा – ५०० लिटर बूट स्पेस , पॉवरट्रेन – १.२-लिटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लिटर डिझेल इंजिन , तर टाटा कर्वची किंमत ९,९९,९९० लाखांपासून सुरू होते.
प्युअर + एस डीसीए ६ एअरबॅग्ज , स्वागत दिव्यासह फ्लश दरवाजाचे हँडल , R17 हायपर स्टाइल व्हील्स , ४ स्पोक इल्युमिनेटेड डिजिटल स्टीअरिंग आदीं सेवेचा समावेश या टाटा CURVV गाडीत असणार आहे .या भव्य ” टाटा CURVV ” गाडीचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खप झाला असून कर्जत तालुक्यातील चार चाकी खरेदी करणाऱ्या ” गाडी चाहत्यांनी ” या दर्जेदार व सुरक्षित असलेली गाडी पहाण्यास व खरेदी करण्यास आजच कर्जत भिसेगाव खिंड रस्त्यालगत , ग्रीन व्हिव हॉटेलच्या समोर असलेल्या शो रुमला भेट द्या , असे आवाहन टाटा हेरिटेज मोटर्स कंपनीचे कर्जत शोरूम मॅनेजर सुनील भोसले यांनी केले आहे .